रवी राणांच्या ‘पीए’च्या घराची झाडाझडती
By Admin | Updated: October 7, 2014 23:26 IST2014-10-07T23:26:49+5:302014-10-07T23:26:49+5:30
बडनेरा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रवी राणा यांचे खासगी स्वीय सहायक विनोद गुहे यांच्या घराची मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह खोलापुरी गेट

रवी राणांच्या ‘पीए’च्या घराची झाडाझडती
कारवाई निष्फळ : निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने टाकली धाड
अमरावती : बडनेरा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रवी राणा यांचे खासगी स्वीय सहायक विनोद गुहे यांच्या घराची मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान निवडणूक आयोगाच्या भरारी पथकासह खोलापुरी गेट पोलिसांनी झाडाझडती घेतली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. मात्र, झाडाझडतीदरम्यान काहीही
आक्षेपार्ह न आढळल्याने ही कारवाई निष्फळ ठरली .
निवडणुकीत मतदारांना वाटण्यासाठी आणलेला पैसा रवी राणांनी त्यांचे स्वीय सहायक विनोद गुहे यांच्याकडे पैसा लपविल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाला मिळाली होती.
रिकाम्या हाताने परतले पोलीस
पथकाचे प्रमुख कोल्हे यांनी खोलापुरी गेट पोलिसांच्या मदतीने पुरुषोत्तमनगरातील विनोद गुहे यांच्या घरी मंगळवारी सकाळी ७ वाजता धाड टाकून तपासणी केली. घराची झाडाझडती घेताना भरारी पथकांतील कर्मचाऱ्यांनी विनोद गुहे यांच्या घर पिंजून काढले होते. मात्र घरात काही आढळले नाही. त्यामुळे भरारी पथक व खोलापुरी गेट पोलीस ठाण्याचे पीएसआय प्रवीण वेरुळकर यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला.