नागपूरच्या कोरोनाग्रस्तांवर ‘सुपर स्पेशालिटी’मध्ये उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:12 IST2021-04-11T04:12:54+5:302021-04-11T04:12:54+5:30

अमरावती : नागपूर जिल्ह्यातील २५ गंभीर रुग्णांवर अमरावती येथील सुपर स्पेशालिटीमध्ये उभारलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. शुक्रवारी ...

Treatment of coronary heart disease in Nagpur in ‘Super Specialty’ | नागपूरच्या कोरोनाग्रस्तांवर ‘सुपर स्पेशालिटी’मध्ये उपचार

नागपूरच्या कोरोनाग्रस्तांवर ‘सुपर स्पेशालिटी’मध्ये उपचार

अमरावती : नागपूर जिल्ह्यातील २५ गंभीर रुग्णांवर अमरावती येथील सुपर स्पेशालिटीमध्ये उभारलेल्या कोविड हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. शुक्रवारी सायंकाळी या रुग्णांना येथे आणण्यात आले व आता या रुग्णालयातील ऑक्सिजन बेडवर त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. दाखल रुग्णांमध्ये मोहपा, काटोल, नरखेड, व वाडी येथील रुग्ण असल्याचे आरोग्य यंत्रणाद्वारे सांगण्यात आले.

नागपूर जिल्ह्यात सध्या रोज सहा हजारांवर पॉझिटिव्हची नोंद होत आहे. याशिवाय ४० ते ५० रुग्णांचे उपचारादरम्यान मृत्यू होत आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या रोज वाढत असल्याने गंभीर रुग्णांना बेडची संख्या कमी पडत आहेत. याउलट परिस्थिती अमरावती जिल्ह्यातील आहे. येथे कोरोनाचा संसर्ग माघारला व चाचण्यामंध्ये पॉझिटिव्हिटीदेखील ८ ते १० टक्क्यांच्या दरम्यान आहे. सध्या जिल्ह्यात ॲडमिट रुग्णांची संख्या ९९७ आहे. या तुलनेत अमरावती जिल्ह्यात २,८०६ बेड येथील विविध ४० रुग्णालयांत उपलब्ध आहेत व १,८०७ बेड सध्या रिक्त आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी ३,६४६ चाचण्या करण्यात आल्या व यामध्ये १०.६५ टक्के पॉझिटिव्हिटी नोंद झाली. सध्या दिल्लीतील आरोग्य पथकाच्या दोन अधिकाऱ्यांद्वारे जिल्ह्यातील संसर्गाची स्थिती व त्याअनुषंगाने येथील व्यवस्था, स्वॅब केंद्र, लसीकरण केंद्र याशिवाय कंटेनमेंट झोनची पाहणी होत आहे. आरोग्य यंत्रणेचा आढावादेखील घेत असल्याचे आरोग्य विभागाद्वारे सांगण्यात आले.

बॉक्स

जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटलची सद्यस्थिती

* २४ डेडिकेटेड कोरोना हॉस्पिटलमध्ये १५८१ बेडची संख्या आहे. यामध्ये ८३६ बेडवर रुग्ण आहेत. ७४३ बेड रिक्त आहेत.

* डेडिकेटेड कोरोना हेल्थ सेंटर तीन आहेत. यामध्ये १२० बेडची संख्या आहे. यातील ४६ व्याप्त, तर ७४ बेड शिल्लक आहेत.

* १३ कोरोना केअर सेंटर आहेत. यामध्ये ११०५ बेडची संख्या आहे. यात ११५ बेड व्याप्त आहेत. \I१०९० \Iबेड शिल्लक आहेत.

पाईंटर

सर्व प्रकारातील कोरोना रुग्णालये : ४०

एकूण बेडची संख्या : ९९७

रुग्णांनी व्याप्त बेड : ९९७

सद्यस्थितीत शिल्लक बेड : १८०७

कोट

नागपूर येथे कोरोनाचा संसर्ग जास्त असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे काही रुग्णांवर येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक.

Web Title: Treatment of coronary heart disease in Nagpur in ‘Super Specialty’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.