तिवसा, मोर्शी, दर्यापूर येथील उपचार केंद्रे सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:16 IST2021-02-27T04:16:31+5:302021-02-27T04:16:31+5:30

अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत तिवसा येथील ट्रामा केअर सेंटरसह मोर्शी व दर्यापूर येथेही उपचार केंद्रे सुरू होणार ...

Treatment centers at Tivasa, Morshi, Daryapur will be started | तिवसा, मोर्शी, दर्यापूर येथील उपचार केंद्रे सुरू होणार

तिवसा, मोर्शी, दर्यापूर येथील उपचार केंद्रे सुरू होणार

अमरावती : जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत तिवसा येथील ट्रामा केअर सेंटरसह मोर्शी व दर्यापूर येथेही उपचार केंद्रे सुरू होणार आहेत. शहरातही उपचारांसाठी शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये आदी ठिकाणी खाटांची संख्या वाढवावी, असे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी शुक्रवारी दिले.

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त आरती सिंह, पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन., महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिल रोहणकार, डॉ. काळे, डॉ. जयश्री नांदुरकर आदी यावेळी उपस्थित होते. जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अधिकाधिक करावे. सध्या स्थानिक दोन्ही प्रयोगशाळांतून अहवाल प्राप्त होत आहेत. पुढे आवश्यकता भासल्यास अकोल्याहूनही अहवाल प्राप्त करून घेता येतील. ग्रामीण भागातही पुरेशा आरोग्य सुविधा उभाराव्यात व जनजागृती करावी, असे निर्देश आयुक्तांनी दिले.

बॉक्स

अशी वाढणार खाटांची संख्या

तिवसा ५० तसेच मोर्शी व दर्यापूर येथे प्रत्येकी २५ याप्रमाणे एकूण १०० खाटा वाढतील. खासगी रुग्णालयात खाटांची संख्या वाढविण्यात येईल. तिथेही साधारणत: १०० खाटा अतिरिक्त उपलब्ध होतील. सारीचे पेशंट वाढत असल्याने यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.

Web Title: Treatment centers at Tivasa, Morshi, Daryapur will be started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.