शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ओव्हरटेक करताना ट्रॅव्हल्स उलटली, पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:18 IST

भरधाव ट्रॅव्हल्स एका वाहनाला ओव्हरटेक करताना रस्त्याच्या पलीकडे उलटल्याची घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता राष्ट्रीय महामार्गावर लोणीनजीक घडली. अपघातातील दोन किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. एका तरुणीसह तिघांना उपचारासाठी अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात आणले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भरधाव ट्रॅव्हल्स एका वाहनाला ओव्हरटेक करताना रस्त्याच्या पलीकडे उलटल्याची घटना शनिवारी दुपारी २.३० वाजता राष्ट्रीय महामार्गावर लोणीनजीक घडली. अपघातातील दोन किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. एका तरुणीसह तिघांना उपचारासाठी अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात आणले.स्वामी टूर्स अ‍ॅन्ड टॅÑव्हल्सची एमएच २८ एबी ९१९८ क्रमांकाची बस पुण्याहून अमरावतीत येत असताना शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास लोणी हद्दीतील मार्गावर अपघातग्रस्त झाली. या अपघातात आठ ते दहा प्रवासी जखमी झाले. अपघातात दीपक सुधाकर जांबवाले (२७, रा.शेंदूरजना खुर्द), शुभम किशोर कुचे (२५,रा.कलेक्टर कॉलनी)सह पाच प्रवासी जखमी झाले. घटनेच्या माहितीवरून लोणीचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात पाठविले. घटनास्थळाचा पंचनामा करून चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला. या ट्रॅव्हल्सवर आ. सुरेश गोरे (खेड. ता.) असे लिहिलेले होते. पुण्यातच प्रवाशांनी ट्रॅव्हल्स मालकाशी संपर्क साधला असता, त्याने प्रतिसाद दिला नाही. त्यातच अपुरी झोप झालेल्या अवस्थेत चालक टॅÑव्हल्स चालवीत होते. शुभम कुचे या प्रवाशाने फोन केला असता, ट्रॅव्हल्स मालकाने प्रतिसाद दिला नाही.प्रवासात अनेक विघ्नपुणे-अमरावती फेरी करणारी नियमित ट्रॅव्हल्स शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता निघण्यापूर्वीच बिघडल्याने ऐनवेळी प्रवाशांसाठी स्वामी टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्सची बस अकोल्याहून बोलाविण्यात आली. ती रात्री १२.२० वाजता पुण्याहून अमरावतीकडे निघाली. त्यातच मेहकरजवळ डिझेल संपले. चालक-वाहकाने डिझेलचा बंदोबस्त केल्यानंतर ट्रॅव्हल्स पुन्हा अमरावतीकडे रवाना झाली. अखेरच्या टप्प्यात ती लोणीजवळ उलटली.

टॅग्स :Accidentअपघात