प्रस्थापितांना धक्का देत अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:16 IST2021-01-19T04:16:08+5:302021-01-19T04:16:08+5:30

प्रहार, संभाजी ब्रिगेड, वंचितनेही खाते उघडले, महाविकास आघाडीची सरसी अंजनगाव सुर्जी : ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्के देत नवतरुणांनी ...

Transformation in many gram panchayats pushing the established | प्रस्थापितांना धक्का देत अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन

प्रस्थापितांना धक्का देत अनेक ग्रामपंचायतींमध्ये परिवर्तन

प्रहार, संभाजी ब्रिगेड, वंचितनेही खाते उघडले, महाविकास आघाडीची सरसी

अंजनगाव सुर्जी : ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्के देत नवतरुणांनी गावगाड्याच्या राजकारणात एंट्री

केल्याचे मतमोजणीत पुढे आले. ३२ उमेदवार अविरोध निवडून आल्यानंतर २८० जागांचे निकाल १८ जानेरावीराला जाहीर झाले. धनेगाव, दहिगाव रेचा, भंडारज, सातेगाव, कापूसतळणी, मुऱ्हा, वनोजा, टाकरखेडा मोरे, कुंभारगाव, एकलारा, कोकर्डा,अशा अनेक गावांत तरुणांनी विजय मिळविले. अनेक गावांत महाविकास आघाडीचा प्रयोगही यशस्वी ठरला, तर अनेक दिग्गजांचा सुपडा साफ झाला. सातेगाव येथे पंचायत समितीचे उपसभापती महेश खारोडे, भाजपचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर दाळू, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सतीश हाडोळे, नरेंद्र येवले, ममता भांबूरकर यांच्या पॅनेलचा मतदारांनी धुवा उडविला. निवडणूक निर्णय अधिकारी वैशाख वाहूरवाघ, नायब तहसीलदार निवडणूक अनंत पोटदुखे, प्रतीक वाटाणे, अविनाश पोटदुखे, राजेश मिरगे, दिनेश ठेलकर, जे.बी. बोंद्रे, किशन हूड, ये.उ. केदार, किरण मुळे, विजय भोंडे आदी अधिकाऱ्यांनी मतदानाचे कामकाज हाताळले.

Web Title: Transformation in many gram panchayats pushing the established

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.