अमरावती ग्रामीणमधील पीआय, एपीआयच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:17 IST2021-08-19T04:17:33+5:302021-08-19T04:17:33+5:30

अमरावती ग्रामीणमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक संजय सोळंके अकोला, तर ब्रम्हदेव शेळके यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. वाशिम येथून ...

Transfers of PI, API in Amravati Rural | अमरावती ग्रामीणमधील पीआय, एपीआयच्या बदल्या

अमरावती ग्रामीणमधील पीआय, एपीआयच्या बदल्या

अमरावती ग्रामीणमध्ये कार्यरत पोलीस निरीक्षक संजय सोळंके अकोला, तर ब्रम्हदेव शेळके यांची वाशिम येथे बदली करण्यात आली. वाशिम येथून शिषिर मानकर व विजय पाटकर, बुलडाणा येथून संतोष टाले, माधवराव गरूड हे पीआय अमरावती ग्रामीणमध्ये येणार आहेत. पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांची बदली अकोला येथे करण्यात आली आहे. अकोला येथून दिनेश शेळके हे अमरावती ग्रामीणला येतील.

अमरावती ग्रामीणमध्ये कार्यरत सहायक पोलीस निरीक्षक गोपाल उपाध्याय, कैलास घट्टे, सुनील पाटील यांची यवतमाळ तर, योगिता ठाकरे यांची बदली अकोला येथे करण्यात आली. तर, अकोला येथून प्रणिता कराळे, तर यवतमाळ येथून मिलन कोयल, राजू साळवे, संदीप चव्हान, राहुल राऊत, बुलडाणा येथून मिलिंदकुमार दवणे अमरावती ग्रामीणमध्ये येणार आहेत.

Web Title: Transfers of PI, API in Amravati Rural