अमरावती : ग्रामीण पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी २५ ऑगस्ट रोजी ग्रामीण पोलीस दलात अंतर्गत खांदेपालट केला. सुमारे ४७ पोलीस निरीक्षक, सहनिरीक्षक, उपनिरीक्षकांचा त्यात समावेश आहे.
नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संतोष ताले परतवाडा ठाणेदार असतील. लहू मोहुंडळे हे मोर्शीचे ठाणेदार असतील. श्रीराम गेडाम अर्ज शाखेत, तर बाळकृष्ण पावरा हे सायबर पोलीस ठाणे सांभाळतील. एपीआयमध्ये देवेंद्र ठाकूर शेंदूरजनाघाट, हरिभाऊ कुलवंत लोणी, तर विक्रांत पाटील हे शिरखेडचे ठाणेदार असतील. आसेगाव येथील समाधान वाठोरे एलसीबीत, सुरेंद्र अहेरकर चांदूरबाजार, केशव ठाकरे वरूड, पंकज तायडे आसेगाव, तर धारणीमध्ये कार्यरत सचिन पाटील यांना अंजनगाव एसडीपीओ म्हणून, राजू सावळे परतवाडा, मिलिंद दवणे धारणी, प्रफुल्ल गीते यांना अचलपूरला पाठिवण्यात आले आहे. एपीआय दीपक वळवी हे शिरजगावचे, तर पंकज दाभाडे हे ब्राम्णवाडा थडीचे ठाणेदार असतील. वर्षा खर्चाण पीआरओ, मनोज सुरवाडे यांची बदली चांदूर रेल्वे ठाण्यात करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षकांमध्ये मंगेश भोयर एलसीबी, राजकुमार मोहोड वाचक अंजनगाव उपविभाग, प्रदीप चव्हाण लोणी, शशीकांत पोहरे वरूड, प्राजक्ता नागपुरे नांदगाव खंडेश्वर, धीरज राजुरकर वरूड, चंद्रकांत बोरसे परतवाडा, दीपाली पाटील अचलपूर, रणजितसिंग ठाकूर शिरजगाव, विठ्ठल वाणी सरमसपुरा, प्रभाकर हंबर्डे माहुली, तर प्रमोद कडू यांची बदली बीडीडीएसला करण्यात आली आहे. संजय गायकवाड चांदूररेल्वे, गणेश मुपडे मंगरूळ दस्तगीर, विलास बोपटे धारणी, गजानन साबळे वाचक चांदूररेल्वे, राजेंद्र टेकाडे शेंदूरजनाघाट, रामरतन चव्हाण खल्लार, तर शेैलेश म्हस्के यांची बदली दर्यापुरात करण्यात आली आहे.