अमरावतीतील चार पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण
By Admin | Updated: November 11, 2014 22:32 IST2014-11-11T22:32:00+5:302014-11-11T22:32:00+5:30
पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या आदेशाने शहर पोलीस आयुक्तालयात क्षेत्रातील चार पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण मंगळवारी करण्यात आले.

अमरावतीतील चार पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण
अमरावती : पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांच्या आदेशाने शहर पोलीस आयुक्तालयात क्षेत्रातील चार पोलीस निरीक्षकांचे स्थानांतरण मंगळवारी करण्यात आले.
प्रशासकीय कारणास्तव शहरातील चार पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश मंगळवारी देण्यात आले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम यांची बदली दंगा नियंत्रण कक्षात करण्यात आली. तर त्यांचा प्रभार फ्रेजरपुऱ्याचे ठाणेदार आर. जी. देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तसेच त्यांना सहायक आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. गाडगेनगरचे पोलीस निरीक्षक देवराव खंडेराव यांंना फ्रेजरपुरा ठाण्याचा प्रभार देण्यात आले आहे. तर नियंत्रण कक्षाचा पदभार सांभाळणारे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील यांच्याकडे नक्षल कारवाई विरोधी पथक प्रमुखाची जबाबदारी सोपविण्यात आले आहे.