जिल्हा परिषदेच्या सात विभागांतील ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:13 IST2021-07-27T04:13:51+5:302021-07-27T04:13:51+5:30

खांदेपालट सुरू ; पशुसंवर्धन, महिला-बाल कल्याण, सिंचन, वित्त, बांधकामचा समावेश अमरावती : जिल्हा परिषदेतील वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची ...

Transfer of 39 employees from seven divisions of Zilla Parishad | जिल्हा परिषदेच्या सात विभागांतील ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

जिल्हा परिषदेच्या सात विभागांतील ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

खांदेपालट सुरू ; पशुसंवर्धन, महिला-बाल कल्याण, सिंचन, वित्त, बांधकामचा समावेश

अमरावती : जिल्हा परिषदेतील वर्ग ३ मधील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया २६ जुलैपासून डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. मुख्य कार्यपालन अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या उपस्थित पहिल्याच दिवशी सात विभागातील ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय व विनंती बदल्यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदेमार्फत सन २०२०-२१ या वर्षातील सर्वसाधारण बदली प्रक्रिया ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार कोविड-१९ चे नियम पाळून सुरू करण्यात आली आहे. बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी पशुसंवर्धन विभागातील नऊ पशुधन पर्यवेक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशासकीय चार आणि विनंती बदल्या पाच, सिंचन विभागातील जलसंधारण अधिकारी यांच्या प्रशासकीय तीन आणि विनंती एक, बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता प्रशासकीय दोन व विनंती दोन, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक प्रशासकीय दोन व विनंती तीन, कनिष्ठ आरेखक विनंती बदली एक, कृषी विभागातील विस्तार अधिकारी प्रशासकीय एक, विनंती तीन, वित्त विभागातील वरिष्ठ सहायक लेखा प्रशासकीय व विनंती प्रत्येकी एक, कनिष्ठ सहायक लेखा विनंती तीन आणि महिला व बाल कल्याण विभागातील पर्यवेक्षिका प्रशासकीय पाच आणि विनंती दोन याप्रमाणे बदली प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी ३९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या जिल्हा परिषद प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने समुपदेशनाद्वारे केल्या आहेत. या बदली प्रक्रियेला सीईओ अविश्यांत पंडा, सामान्य प्रशासनचे डेप्युटी सीईओ तुकाराम टेकाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे, कार्यकारी अभियंता शिरीष तट्टे, राजेंद्र सावळकर, नीला वंजारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय राहाटे आदी उपस्थित होते. पंकज गुल्हाने व अन्य सहकारी कर्मचाऱ्यांचे या प्रक्रियेसाठी सहकार्य लाभले.

बाॅक्स

आज तीन विभागाच्या बदल्याश

जिल्हा परिषदेत बदली प्रक्रियेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २७ जुलै रोजी पंचायत विभाग, सामान्य प्रशासन आणि शिक्षण विभागात शिक्षक संवर्ग सोडून अन्य कर्मचाऱ्यांच्या बदल्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे.

Web Title: Transfer of 39 employees from seven divisions of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.