इलेक्ट्रॉनिक विभागातील शिक्षकांना आयएसटीई अंतर्गत प्रशिक्षण
By Admin | Updated: June 21, 2016 00:17 IST2016-06-21T00:17:18+5:302016-06-21T00:17:18+5:30
व्हीएलएसआय डिझाईन क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन ...

इलेक्ट्रॉनिक विभागातील शिक्षकांना आयएसटीई अंतर्गत प्रशिक्षण
कार्यशाळा : हव्याप्र अभियांत्रिकी महाविद्यालयाची तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी
अमरावती : व्हीएलएसआय डिझाईन क्षेत्रातील ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे, या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेलिकम्युनिकेशन विभागाच्या शिक्षकांसाठी आयएसटीई मान्यता प्राप्त इमेज प्रोसेंसिंगसंदर्भात रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अतिसूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन क्षेत्रातील संधी तसेच समस्या निवारणाचे कौशल्य शिक्षक व त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक श्रीकांत चेंडके व प्राचार्य ए.बी. मराठे यांच्या मार्गदर्शनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत जेडीएम डिझाईन टेक्नोलॉजी कंपनीतर्फे महाविद्यालयात व्हीएलएसआय सेंटर उभारण्यात येणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण, तांत्रिक सल्ला, विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी, संशोधनासाठी मदत तसेच औद्योगिक क्षेत्र व नियोजित अभ्यासक्रमामध्ये समन्वय ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या यशाबद्दल मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, सचिव माधुरी चेंडके यांनी विभाग प्रमुख उज्ज्वला बेलोरकर यांच्यासह शिक्षकांचे अभिनंदन केले.
नामवंत तज्ज्ञांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
१३ ते २२ जून या १० दिवसीय कार्यशाळेत जेडीएम डिझाईनचे संचालक राजवर्धन यांच्यासह देशभरातील नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिक्षकांना मिळत आहे. या कार्यशाळेत अॅप्लिकेशन आॅफ इमेज प्रोसेंसिंग, व्हीएलएसआय, इम्प्लिमेंटेशन आॅफ व्हीसीएसआय अॅन्ड इमेज प्रोसेंसिंग आॅन एफपीजीए अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यशाळेत आशिष खराते व अक्षय वर्तक यशस्वीरीत्या जबाबदारी सांभाळत आहेत.