रेल्वे, एसटीत तुडूंब गर्दी
By Admin | Updated: May 11, 2014 22:50 IST2014-05-11T22:50:45+5:302014-05-11T22:50:45+5:30
केंद्र शासनाच्या टपाल विभागाच्यावतीने रविवारी विविध पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमुळे केंद्रस्थळी पोहोचण्यासाठी परीक्षार्थांनी रेल्वे गाड्या आणि एसटीने जाणे पसंत केले.

रेल्वे, एसटीत तुडूंब गर्दी
अमरावती : केंद्र शासनाच्या टपाल विभागाच्यावतीने रविवारी विविध पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमुळे केंद्रस्थळी पोहोचण्यासाठी परीक्षार्थांनी रेल्वे गाड्या आणि एसटीने जाणे पसंत केले. मात्र रेल्वे, एसटीत एकच गर्दी उडाल्याने परीक्षार्थ्यांचे हाल झाले. तरीदेखील परीक्षेला जाण्याची जिद्द ही लक्ष वेधणारी ठरली. टपाल विभागाच्यावतीने पोस्टल सहायक, शॉर्र्टिंग सहायक, पोस्टल सहायक (बचत बँक) अशा विविध जागांसाठी सुमारे एक हजार पदभरतीसाठी राज्यभरात रविवारी परीक्षा घेण्यात आली. या पदांसाठी लाखो परीक्षार्थ्यांनी आवेदन भरले होते. त्यानुसार विदभातर््ाील परीक्षार्थ्यांसाठी नागपूर हे लेखी परीक्षेचे केंद्र टपाल विभागाने निश्चित केले. एकाच वेळी रविवारी दुपारी २ ते ४ या दरम्यान लेखी परीक्षेचा वेळ निश्चित असल्याने नागपूर येथे जाण्यासाठी येथील मध्यवर्ती बसस्थानक, बडनेरा रेल्वे स्टेशनवर सकाळी ७ ते ९ या कालावधीत जणू यात्रेचे स्वरुप आले होते. विशेषत: परीक्षार्थी मुली, महिलांसोबत त्यांच्या नातेवाईकांनाही नागपूरकडे प्रवास करताना अनेक हालअपेष्टा सहन करीत नागपूर गाठावे लागले, हे वास्तव आहे. या पद भरतीबाबत राज्य परिवहन विभागाला पूर्व कल्पना नसल्याने नागपूरकडे वेळेवर जादा बसेस सोडता आल्या नाही, अशी माहिती बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सी. बी. यादव यांनी दिली. येथील मध्यवर्ती बसस्थानकावर उसळलेली गर्दी बघता परीक्षार्थ्यांना नागपूरकडे जाण्याकरिता प्राधान्य देण्यासाठी आगार व्यवस्थापक नीलेश बेलसरे, बसस्थानक प्रमुख अभय बिहुरे यांनी मोलाची भूमिका बजावली.