कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरला
By Admin | Updated: July 11, 2017 17:32 IST2017-07-11T17:32:51+5:302017-07-11T17:32:51+5:30
कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा एक डबा रूळाखाली घसरला. ही घटना मंगळवार ११ जुलै रोजी दुपारी घडली. यानंतरही एका ट्रॅकवरून प्रवासी गाड्या सुरळीत सुरू होत्या.

कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा डबा घसरला
लोकमत न्यूज नेटवर्क
बडनेरा : कुरूम रेल्वेस्थानकाजवळ मालगाडीचा एक डबा रूळाखाली घसरला. ही घटना मंगळवार ११ जुलै रोजी दुपारी घडली. यानंतरही एका ट्रॅकवरून प्रवासी गाड्या सुरळीत सुरू होत्या.
कुरूम रेल्वेस्थानकानजीकच्या एका केबिनसमोरील रेल्वे ट्रॅकवर गिट्टी टाकणाऱ्या मालगाडीचा एक डबा रूळावरून घसरला. सुदैवाने गाडीचा वेग अगदीच कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. घसरलेला डबा इंजिनपासून अकरावा होता. ही मुंबईकडे जाणारी मुख्य रेल्वेलाईन असल्याने रेल्वे प्रशासनाने तातडीने हालचाली करून मूर्तिजापूर येथून ‘एआरटी व्हॅन’आणली. या व्हॅनच्या माध्यमातून घसरलेला डबा तासाभरात पुन्हा रूळावर आणण्यात आला. मालगाडीचा डबा रूळाखाली कसा आला, हे समजू शकले नाही. घटनास्थळी रेल्वे प्रशासनातील अधिकारी बावणे, निशाने, व्ही.डी.कुंभारे, किशोर लोहबरे, आर.पी.अग्रवाल, विनोद वानखडे, चतुर्वेदी, अशोक चव्हाण, रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी उपस्थित होते.