शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू

By प्रदीप भाकरे | Updated: April 7, 2026 10:06 IST

अमरावतीमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अमरावती: अमरावती-अकोला महामार्गावर सोमवारी मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात बडनेरा येथील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलोरा विमानतळाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. विशेष म्हणजे, अपघातात प्राण गमावलेले चारही तरुण बडनेरा जुनी वस्ती येथील रहिवासी असल्याचे समोर आले असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.​मिळालेल्या माहितीनुसार, बडनेरा येथील सात युवक मध्यरात्री चहा पिण्यासाठी बेलोरा विमानतळाजवळील एका हॉटेलमध्ये गेले होते. चहा घेऊन परतत असताना त्यांची कार अनियंत्रित होऊन रस्त्याकडच्या झाडावर जोरात आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारमधील चार तरुणांचा जागीच मृत्यू झाला.

​मृतकांत मोहम्मद अनस मोहम्मद सईद (वय २०, रा. बडनेरा जुनी वस्ती), मोहम्मद तल्हा मोहम्मद अनीस (वय २२, रा. बडनेरा जुनी वस्ती), मोहम्मद अवेझ मोहम्मद सईद (वय २६, रा. बडनेरा जुनी वस्ती) व अब्दुल अनवेस अब्दुल सलीम (वय २२, रा. बडनेरा जुनी वस्ती) यांचा समावेश असल्याची माहिती बडनेरा पोलिसांनी दिली.

या अपघातानंतर संबंधित ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच बडनेरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अधिक तपास करत आहेत. कार अनियंत्रित होऊन झाडावर धडकल्याने हा अपघात झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.

​जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार

या अपघातातील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी अमरावती येथील बडनेरा रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांच्यावर सतत उपचार करत आहेत. एकाच भागातील चार तरुणांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने बडनेऱ्यात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अपघाताची नोंद केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Amravati-Akola Highway Accident: Four Youths Die Returning From Tea

Web Summary : Four youths died and three were injured in a tragic accident on the Amravati-Akola highway near Belora airport. The victims, residents of Badnera, were returning from a tea break when their car crashed into a tree.
टॅग्स :AmravatiअमरावतीAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यू