चार दिवसांपासून उड्डाणपुलावरील वाहतूक बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:14 IST2021-03-10T04:14:10+5:302021-03-10T04:14:10+5:30
नांदगाव पेठ : शनिवारी सकाळी एका कंटेनरने धडक दिल्याने येथील उड्डाणपूल क्षतिग्रस्त झाला. गत ...

चार दिवसांपासून उड्डाणपुलावरील वाहतूक बंद
नांदगाव पेठ : शनिवारी सकाळी एका कंटेनरने धडक दिल्याने येथील उड्डाणपूल क्षतिग्रस्त झाला. गत चार दिवसांपासून दुरुस्ती सुरू असल्याने नागपूरकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. नांदगाव पेठ सर्व्हिस रोडवरून नागपूरची वाहतूक वळती करण्यात आली असून, उड्डाणपूलाला तडे गेल्याने वाहतूकदारांमध्ये अजूनही भीती कायम आहे. भविष्यात जड वाहतूक होताना कोणतीही अनुचित घटना घडू नये एवढीच अपेक्षा सध्या विभागाकडून असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.
जनावरांची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरने धडक दिल्याने उड्डाणपुलाच्या आतील गिट्टी बाहेर आली होती. त्या अनुषंगाने माध्यमांनी हा पूल कोसळणार असल्याची भीती व्यक्त करीत वृत्त प्रकाशित केले होते. मात्र प्रकल्प महाव्यवस्थापक व्ही.बी. ब्राम्हणकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, उड्डाणपूल बांधकामाची रचनाच अशी असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घोळ झालेला नाही.आतून थोड्या प्रमाणात गिट्टी बाहेर पडली व त्यामध्ये आणखी गिट्टीची भर घालून उड्डाणपूलाच्या दुरुस्तीचे कार्य प्रगतिपथावर असल्याचेदेखील त्यांनी माध्यमांना सांगितले.