रहदारी शुल्क वसुली रद्द
By Admin | Updated: July 21, 2014 23:38 IST2014-07-21T23:38:55+5:302014-07-21T23:38:55+5:30
महानगरपालिका हद्दीत प्रवेश करताना वाहनांकडून वसूल केला जाणारा रहदारी शुल्क (टीपी पास) येत्या १५ आॅगस्टपासून बंद करण्याच्या निर्णय राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी

रहदारी शुल्क वसुली रद्द
मुख्यमंत्र्यांची घोषणा : अमरावतीला १२ कोटींचा फटका
अमरावती : महानगरपालिका हद्दीत प्रवेश करताना वाहनांकडून वसूल केला जाणारा रहदारी शुल्क (टीपी पास) येत्या १५ आॅगस्टपासून बंद करण्याच्या निर्णय राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी घेतला . या निर्णयाने वाहन चालकांना मोठा दिलासा तर महापालिकेला फटका बसणार आहे.
स्थानिक संस्था कर हद्दपार करावा, ही व्यापाऱ्यांची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. मात्र वाहनचालकांनी टीपी पास रद्द करावा, ही केलेली मागणी शासनाने जलद गतीने मंजूर केली आहे. एलबीटीबाबत अद्यापपर्यत शासनाने ठोस भूमिका घेतली नसल्याने व्यापारी, उद्योजक व महापालिका प्रशासन संभ्रमावस्थेत आहे. महापालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेल्या एलबीटीची वसुली माघारल्याने आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे.
अशातच मुख्यमंत्र्यांनी टीपी पास वसुली बंदचा निर्णय घेतल्याने वर्षाकाठी महापालिकेला १२ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर गंडातर येणार आहे.
महापालिका हद्दीत ९ टोल नाक्यावर मे. कोणार्क इन्फ्राट्रक्चर प्रा. लि.कडे टीपी पास वसूल करण्याची जबाबदारी महापालिकेने सोपविली होती. परंतु टीपी पास वसुलीचा मार्ग बंद झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)