वरूडचा पारंपरिक पोळा उत्साहात

By Admin | Updated: September 3, 2016 00:11 IST2016-09-03T00:11:31+5:302016-09-03T00:11:31+5:30

येथील केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारा पारंपरिक पोळा गुरुवारी पार पडला.

The traditional pole of the woods | वरूडचा पारंपरिक पोळा उत्साहात

वरूडचा पारंपरिक पोळा उत्साहात

वरूड : येथील केदारेश्वर मंदिराच्या प्रांगणात शेकडो वर्षांची परंपरा जोपासणारा पारंपरिक पोळा गुरुवारी पार पडला. तहसीलदार राम लंके यांच्या हस्ते तोरण तोडून पोळा फुटला. तोरणाखाली शेकडो बैलजोड्यांनी हजेरी लावली. वरूडमध्ये तीन पोळे भरतात. यामध्ये कडंूचे गोठाण आणि राजुरा नाका परिसरातील पोळ्याचा समावेश आहे. 
केदारेश्वर मंदिरात तोरण बांधण्याचा मान आंडे परिवाराला असल्याने या कुटुंबाकडून पोळ्याचे आयोजन केले जाते. तहसीलदार लंके यांच्या हस्ते तोरण तोडले गेले, तर कडूंचे गोठाण आणि राजुरानाका परिसरातील पोळ्यामध्येसुद्धा शेकडो जोड्या उपस्थित होत्या. बदलत्या काळात गोधनावर संकट उभे ठाकल्याने यांत्रिक शेती सुरू झाली आणि पर्यायाने बैलांची संख्या रोडावत चालली आहे. मात्र, पोळ्याची परंपरा शेकडो वर्षांनंतरही निरंतर सुरू आहे. यामुळे येथील ऐतिहासिक पोळ्याला अधिक महत्त्व आहे. या पोळ्यामध्ये शेकडोे शेतकरी आणि धुरकरी नवीन कपडे परिधान करून उपस्थित होते. आ. अनिल बोंडे, वसुधा बोंडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर काळे, नगराध्यक्ष रवींद्र थोरात, नीळंकठ आंडे, तहसीलदार आशिष बिजवल, केदारेश्वर संस्थानचे अनिल जावळे, नायब तहसीलदार कमलाकर देशमुख, ठाणेदार गोरख दिवे, एपीआय चित्तरंजन चांदुरे, शिंगाडे, पीएसआय प्रफुल्ल डाउले, संगीता गावंडे, दिलीप श्रीराव आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The traditional pole of the woods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.