कामगार संघटना एकवटल्या

By Admin | Updated: December 10, 2014 22:50 IST2014-12-10T22:50:11+5:302014-12-10T22:50:11+5:30

एसटी कामगार संघटना, इंटक, महाराष्ट्र मोटार कामगार संघ, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी संलग्नित असलेल्या

Trade unions gathering | कामगार संघटना एकवटल्या

कामगार संघटना एकवटल्या

अमरावती/ बडनेरा : एसटी कामगार संघटना, इंटक, महाराष्ट्र मोटार कामगार संघ, महाराष्ट्र एसटी कामगार सेना, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाशी संलग्नित असलेल्या कामगार संघटनांनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात आंदोलन पुकारले. वाहक, चालक आणि प्रवाशांना अतिशय क्लेषदायी ठरणाऱ्या भंगार बसेस या पुढे रस्त्यावर चालणार नाही, ही प्रमुख मागणी संयुक्त कृती समितीने रेटून धरली. नादुरुस्त एसटी असल्यामुळे अनेकदा ती रस्त्यावर थांबविण्याचा प्रसंग ओढावत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही याकडे वरिष्ठांनी लक्ष दिले नाही, असा कामगार संघटनांनी केला. रस्त्यावर भंगार असलेली एसटी बंद पडली की ती दुरुस्त करण्यासाठी चालकांकडे साहित्य राहत नाही. परिणामी यांत्रिकी विभागात कर्मचारी येईस्तोवर ही एसटी ताच ठिकाणी थांबून ठेवावी लागते, हे वास्तव देखील आंदोलन दरम्यान कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला. वाहक व चालकांना विनाकारण मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची बाब मांडल्या गेली. भंगार बस गाड्यांमुळे प्रवाशांचा रोष कर्मचाऱ्यांना सहन करावा लागतो. त्यामुळे मोटरवाहन कायद्यानुसार बसेस मिळणार नाही, तेथेपर्यंत एसटी रस्त्यावर धावणार नाही, अशी टोकाची भूमिका संयुक्त कृती समितीने घेतला. एकिकडे एसटीची चाके थांबली असताना या आंदोलनाचा तोडगा कधी निघेल, या प्रतीक्षेत पहाटे पाच वाजेपासून अनेक प्रवाशांना सकाळी १० वाजपर्यंत प्रतीक्षा करावी लागली. अचानक पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाने राज्य परिवहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक, प्रादेशिक अभियंता, विभाग नियंत्रक आणि यांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेर सर्व जबाबदार अधिकारी एकवटले. एसटी कामगार कृती संयुक्त समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एसटी चालक, वाहकांच्या समस्या जाणून घेतल्या. प्रमुख सहा मागण्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक तोडगा काढल्यानंतर लेखी आश्वासनाअंती थांबलेली एसटीची चाके सुरु करण्याचा निर्णय संयुक्त कृती समितीने घेतला. यावेळी विभागीय नियंत्रक कालीदास महाजन, राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय व्यवस्थापक आर.एम. पठारे, विभागीय नियंत्रक पाटील आदींनी चिघळणारे हे आंदोलन क्षमविण्यात मोलाची भूमिका बजावली. चर्चेच्या वेळी एसटी कामगार संघटनेचे अभय बिहुरे, इंटकचे राजाभाऊ लुंगे, महाराष्ष्र मोटार कामगार संघाचे शैलेश विश्वकर्मा, महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे उदय पांडे, रमेश उईके आदींनी कामगारांच्या हिताचे मुद्दे अधिकाऱ्यांच्या पुढ्यात ठेवले. आंदोलनामुळे आगारातील ६८ तर बडनेरा आगारातील ३७ बसेस पाच तासभर थांबल्यात. (प्रतिनिधी)

Web Title: Trade unions gathering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.