डिझेल दरवाढीमुळे टॅक्टर मशागत महागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST2021-02-05T05:25:26+5:302021-02-05T05:25:26+5:30
अमरावती: डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने शेतीसाठी ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. ...

डिझेल दरवाढीमुळे टॅक्टर मशागत महागली
अमरावती: डिझेलच्या किमतीत वाढ झाल्याने शेतीसाठी ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढले आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. दरवर्षी दर वाढत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
ट्रॅक्टरव्दारे मशागत करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून सद्यस्थितीत मशागत ट्रॅक्टरव्दारे केल्या जात आहे. रब्बी हंगामात गहू हरभरा कांदा लागवडीची कामे सुरू असल्याने शेतकरी व्यस्त आहेत. अशातच खरीप हंगाम आटोपण्याच्या मार्गावर आहे. डिझेल व पेट्रोलचे दर गगनाला भिडल्याने परिणामी ट्रॅक्टर मालकांना मशागतीची दर वाढविण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सध्या गतवर्षीच्या तुलनेत यंदा एकरी २०० रुपयांनी दर वाढल्याचे चित्र आहे. गतवर्षी नांगरणी प्रति एकर १००० रुपये होता. यंदा १,२०० घेतला जात आहेत. ग्रामीण भागात मजुरांची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना जास्त मजुरी द्यावी लागत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अशातच आता शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या मशागतीसाठी १५ ते २० टक्के अतिरक्त पैसे मोजावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला असून उत्पादन खर्चात वाढ झाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे.
बॉक्स
मशागतीचा एकरी ३,५०० रुपये खर्च
१) बैलाची संख्या कमी झाल्याने पर्यायाने ट्रॅक्टरने मशागत करावी लागत आहे. त्यामुळे अधिक फटका सहन करावा लागतो.
२) शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मशागतीकडे कल वाढला आहे. गावात टॅक्टरची संख्या कमी असल्याने शेतकऱ्यांना एका ट्रॅक्टरच्या भरोसा राहावे लागते.
३) शेतकऱ्यांना एकरी मशागतीचा खर्च ४,५०० रुपये येत आहे. उत्पादन होत नसल्याने शेतकरी अडचणीत आर्थिक कोंडीत सापडले जात आहेत.
बॉक्स
मशागतीची दर प्रति एकर
नांगरणी १००
१२००
रोटा ८००
१०००
खुरटणी ४००
५००
पेरणी ६००
८००
पालकुट्टी २५० (शेकडा)
३०० (शेकडा)
२०२०-२०२१
कोट
यंदा सततचा पाऊस व परतीच्या पावसाने खरीप हंगामात पिकांची नुकसान झाले. लागवडीचा खर्चही वसूल झाला नाही. रब्बी हंगामात पैशाची जुळवाजुळव करून पेरणी सुरू केली. त्यामध्ये यंदा ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पेरणीचा खर्च वाढल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे शासनाने शेतमालाचे भाव वाढवावे.
विनोद टेकाडे
शेतकरी, निमखेड बाजार
कोट
डिझेलचे दर वाढल्याने परिणामी मशागतीचा दर वाढवावा लागला. कमी दर आकारल्यास ट्रॅक्टरचे भाडे परवडणारे नाही. चालकाची मजुरीही वाढली आहे. त्यामुळे ही दरवाढ नाइलाजास्तव करावी लागली.
अनिल कावरे
ट्रॅक्टर मालक