दोन दिवसांपासून तिवसा टोल बंद

By Admin | Updated: November 1, 2016 00:16 IST2016-11-01T00:16:13+5:302016-11-01T00:16:13+5:30

टोलवरील बिस्कीटच्या व्यवहारातील नफा दिवाळीचे बोनस म्हणून देण्यात यावा,...

Towards a two-day toll off | दोन दिवसांपासून तिवसा टोल बंद

दोन दिवसांपासून तिवसा टोल बंद

कर्मचारी सामूहिक रजेवर : बिस्किटांचे कमिशन दडपल्याचा आरोप
तिवसा : टोलवरील बिस्कीटच्या व्यवहारातील नफा दिवाळीचे बोनस म्हणून देण्यात यावा, यासह अन्य मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही मागण्या मंजूर न झाल्याने अमरावती - नागपूर राष्ट्रीय महमार्गावरील तिवसा येथील टोलनाका कर्मचाऱ्यांनी ३० आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० पासून २ नोव्हेंबरपर्यंत सामूहिक रजा टाकल्याने महामार्गावरील हजारो वाहने टोल फ्री झाली आहेत.
परिणामी दिवसा जमा होणारा दीड लाखांचा चुना कंपनीला लागत आहे. टोल कर्मचाऱ्यांनी २ तारखेनंतर आक्रमक पवित्रा घेण्याचा इशारा दिला आहे. अमरावती - नागपूर राष्ट्रीय महमार्गावर तिवसा येथे २००५ साली टोलची उभारणी केली होती. तेव्हा तिवसा येथील ५० बेरोजगारी युवक यांना टोलवर रोजगार मिळाला. मात्र वाहनचालकांना चिल्लर ऐवजी बिस्कीटचे पॅकेट्स वाटत होते. परिणामी चार वर्षांत कर्मचाऱ्यांचे कंपनीकडे १३ लाख रुपये थकीत आहे. यासाठी यंदा दिवाळीमध्ये बोनस म्हणून १४ लाख रुपये कंपनीच्या नावाने टोल फलक व इतर सूचना फलकाचे नूतनीकरण, नियमानुसार पगारवाढ न करणे, सर्वच ‘व्ही लेन सुरू करावे, अशा मागण्यांसाठी टोल कर्मचारी आग्रही होते. यंदातरी दिवाळी साजरी व्हावी, या आशेत असताना यावर पाणी फेरल्याने टोल कंपनी आमचे शोषण करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला. दिवाळीदिनी ३० पासून सर्वच ५० ही कर्मचाऱ्यांनी टोलच्या कामावर न जाण्याचा निर्णय घेतला. २ नोव्हेंबरपर्यंत सामूहिक रजा टाकण्यात आल्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Towards a two-day toll off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.