शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चिखलदऱ्यातील थरार, पंचबोल पॉइंट्सच्या दरीत पर्यटक कोसळला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 17:36 IST

दीडशे फूट दरीत अडकला  

ठळक मुद्देदीडशे फूट दरीत अडकला   चिखलदऱ्यातील विविध पॉइंटला भेटी देत रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते पंचबोल पॉइंटवर पोहोचले.

चिखलदरा (अमरावती) : मित्रांसोबत फिरायला आलेला वर्धेचा युवक येथील पंचबोल पॉइंटच्या खोल दरीत कोसळला. पर्यटकांच्या काळजात धस्स झाले. मात्र, तो दरीत दीडशे फूट अंतरावरील झाडाला अडकल्याने सुखरुप बचावला. त्याच्या मित्रांनी पोलिसांच्या सहकार्याने त्याला सुखरूप बाहेर काढले. रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास हा थरार घडला. आकाश राजू बैलमारे (२३, रा. किनाडा ता.हिंगणघाट जि.वर्धा) असे जखमी युवकाचे नाव आहे.

आकाश बैलमारे, मंगेश पाटील, प्रणय पाटील, रोशन सुरजुशे, शुभम गाडगे, रुपेश बावने, राकेश बोबडे हे मित्र एमएच ०६ एएन ६९७५ क्रमांकाच्या वाहनाने  चिखलदरा येथे फिरायला आले होते. चिखलदऱ्यातील विविध पॉइंटला भेटी देत रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ते पंचबोल पॉइंटवर पोहोचले. पैकी आकाश बैलमारे नियमांचे उल्लंघन करून दरीच्या कपारीवर गेला. पाय घसरल्याने खाली कोसळला. तथापि, दीडशे फूट अंतरावर जाऊन झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. चिखलदºयाचे ठाणेदार आकाश शिंदे, नगरसेवक अरुण तायडे यांनी रोपवेच्या सहाय्याने त्याला बाहेर काढले. डोक्याला किरकोळ इजा झाल्याने त्याच्यावर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदर युवक शौचास गेला असता दाट धुक्यात पाय घसरल्याने हा अपघात झाल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात पर्यटकांची हुल्लडबाजी सुरू असल्याने हा अपघात झाल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

अपघाताच्या सतत घटनाचिखलदरा पर्यटन स्थळावर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दाट धुके पसरले असल्यामुळे हजारोच्या संख्येने पर्यटकांनी शनिवार-रविवार या दोन दिवसांत हजेरी लावली. त्यात पर्यटनस्थळावरील नियमांना पायदळी तुडवत पर्यटक हुल्लडबाजी करीत असल्याने असे अपघात सतत घडत आहेत. 

टॅग्स :amravati-acअमरावतीChikhaldaraचिखलदराAccidentअपघात