पर्यटकांनो, चिखलदऱ्यात या पण वन-वे मार्गाचाच अवलंब करा; जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाची अधिसूचना

By गणेश वासनिक | Published: July 22, 2023 05:11 PM2023-07-22T17:11:38+5:302023-07-22T17:30:39+5:30

जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तीन महिने पर्यटकांच्या संरक्षणासाठी निर्णायक

Tourists, come to the swamp but follow the one-way route; Notification of District Administration, Police Administration | पर्यटकांनो, चिखलदऱ्यात या पण वन-वे मार्गाचाच अवलंब करा; जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाची अधिसूचना

पर्यटकांनो, चिखलदऱ्यात या पण वन-वे मार्गाचाच अवलंब करा; जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासनाची अधिसूचना

googlenewsNext

अमरावती : चिखलदरा विदर्भाचे नंदनवन आहे. पावसाळ्यात जुलै ते सप्टेंबर असे तीन महिने पर्यटकांची प्रचंड गर्दी असते. विशेषत: शनिवार, रविवार दोन दिवस चिखलदरा मार्गावर वाहनांची जणू यात्राच भरते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने आठवड्यातून शनिवार, रविवार दोन दिवस चिखलदरा-परतवाडा ये-जा करण्यासाठी वन-वे मार्ग निश्चित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने प्रशासनाने अधिसूचना जारी केली आहे.

यंदा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर तीन महिने परतवाडा-चिखलदरा (मडकी-मोथा-चिखलदरा) मार्ग येण्याकरिता तर, चिखलदरा-परतवाडा (सलोना-घटांग-परतवाडा)मार्ग जाण्याकरिता एक मार्गी (वन- वे) असे शनिवार आणि रविवार दोन दिवस असणार आहे. चिखलदरा येथे वाहनाने ये-जा करताना अधिसूचना जारी केलेल्या मार्गानुसार वाहनचालकांना नियम पाळावे लागतील. चिखलदरा येथे पर्यटकांची होणारी गर्दी आणि सुरक्षेच्या अनुषंगाने आठवड्यातील शनिवार, रविवार असे दोन वन-वे मार्गाचा वापर करावा लागेल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर जिल्हाधिकारी विवेक घोळके यांनी अधिसूचनेद्वारे कळविले आहे.
 

Web Title: Tourists, come to the swamp but follow the one-way route; Notification of District Administration, Police Administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.