जत्राडोहात अकोला जिल्ह्यातील पर्यटक बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:10 IST2021-07-24T04:10:41+5:302021-07-24T04:10:41+5:30

चिखलदरा (अमरावती) : येथील प्रसिद्ध जत्राडोहात अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड येथील एक पर्यटक युवक बुडाला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ही ...

Tourists from Akola district drowned in Jatradoha | जत्राडोहात अकोला जिल्ह्यातील पर्यटक बुडाला

जत्राडोहात अकोला जिल्ह्यातील पर्यटक बुडाला

चिखलदरा (अमरावती) : येथील प्रसिद्ध जत्राडोहात अकोला जिल्ह्याच्या हिवरखेड येथील एक पर्यटक युवक बुडाला. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली. अंधारामुळे शोधकार्य थांबविण्यात आले.

समीर बेग शकिर बेग (२२, रा. हिवरखेड ता. तेल्हारा जिल्हा अकोला) असे बुडालेल्या तरूणाचे नाव आहे. तो आपल्या काही मित्रांसह चिखलदरा पर्यटनस्थळावर फिरायला आला होता. शुक्रवारी सायंकाळी पोहण्याच्या नादात त्याने जत्राडोहात उडी मारली. मात्र, बाहेर न आल्याने मित्रांनी आरडाओरड केली. चिखलदारा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली असून, शोधकार्य सुरू असल्याचे ठाणेदार राहुल वाढवे यांनी सांगितले.

बॉक्स

सुरक्षा वाऱ्यावर

चिखलदरा पर्यटन स्थळावरील कलालकुंडमध्ये रिद्धपूर, चिचाटी येथे अमरावती येथून एका कोचिंग क्लासने सहलीसाठी आलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. शुक्रवारी हिवरखेड येथील पर्यटक बुडाला. याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी नागपूर येथील पर्यटकाचा फोटो काढण्याच्या नादात मृत्यू झाला होता. त्यामुळे पर्यटन स्थळावरील सुरक्षा चव्हाट्यावर आली आहे.

Web Title: Tourists from Akola district drowned in Jatradoha