विद्युत खांबाच्या तंगाव्याला स्पर्श, युवकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:10 IST2021-07-19T04:10:10+5:302021-07-19T04:10:10+5:30

दत्तापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरेश वांजाराव पवार हा जळगाव आर्वी येथील पारधीबेडा येथील रहिवासी होता. वडील जंगलातून परत आले ...

Touching the pole of the electric pole, the youth died on the spot | विद्युत खांबाच्या तंगाव्याला स्पर्श, युवकाचा जागीच मृत्यू

विद्युत खांबाच्या तंगाव्याला स्पर्श, युवकाचा जागीच मृत्यू

दत्तापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरेश वांजाराव पवार हा जळगाव आर्वी येथील पारधीबेडा येथील रहिवासी होता. वडील जंगलातून परत आले नसल्याने अमरेश त्यांंना शोधायला रामगाव शिवारात गेला होता. सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास रामगाव शिवारातील एका विद्युत खांबाला लागलेल्या विद्युत प्रवाहित लोखंडी तंगाव्याला अचानक हात लागला. विजेचा करंट लागून जबर धक्का बसल्याने अमरेशचा जागीच मृत्यू झाला. ठाणेदार ब्रम्हदेव शेळके यांनी घटनास्थळ गाठले. विजेचा करंट लागून जबर धक्का बसल्यानेच मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज दत्तापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान फिर्यादी मृताची आई इंदिरा वांजाराव पवार यांच्या फिर्यादीवरून दत्तापूर पोलिसांनी मर्ग दाखल केला. मृतदेहाचे शवविच्छेदन करून कुटुंबीयांनी अंत्यसंस्कार केला. शवविच्छेदन अहवालावरून प्रत्यक्षात मृत्यू कशाने झाला, हे स्पष्ट होईल. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू उईके व दत्तापूर पोलीस करीत आहेत.

Web Title: Touching the pole of the electric pole, the youth died on the spot