‘त्या’ वृध्देच्या टॉप्सच्या ठेप्या घरातच
By Admin | Updated: January 31, 2016 00:16 IST2016-01-31T00:16:46+5:302016-01-31T00:16:46+5:30
स्थानिक किशोर नगरात १५ दिवसांपूर्वी मधुमालती धारिया यांची गळा आवळून हत्या करण्यात आली.

‘त्या’ वृध्देच्या टॉप्सच्या ठेप्या घरातच
अमरावती : स्थानिक किशोर नगरात १५ दिवसांपूर्वी मधुमालती धारिया यांची गळा आवळून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे गूढ कायम असताना धारियांच्या मोठ्या सुनेला घरातच मधुमालती यांच्या कानातल्या टॉप्सच्या ठेप्या आढळून आल्या. त्यामुळे आता लवकरच हत्येचे गूढ उलगडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१४ जानेवारी रोजी वरिष्ठ वकील जालंधर धारिया यांची पत्नी मधुमालती धारिया (६५) यांची हत्या झाली. यावेळी जालंधर धारिया हे तिवसा येथे न्यायालयीन कामानिमित्त गेल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. सायंकाळी जालंधर घरी आल्यावर त्यांना पत्नी मृतावस्थेत आढळली.
सुनेचे बयाण नोंदविले
अमरावती : हत्या करणाऱ्यांनी चोरीच्या उद्देशाने मधुमालती यांची हत्या केल्याचा अंदाज पती व पोलिसांनी वर्तविला. त्या दिशेने पोलिसांनी तपासकार्य सुरू केले. मृत मधुमालती यांचे काही सोन्याचे दागिने व घरातील एलसीडी चोरी गेल्याचे जालंधर धारिया यांनी पोलिसांना बयाणात सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी धारिया यांच्या मोठ्या सुनेचे बयाण पोलिसांनी नोंदविले असून घराची स्वच्छता करताना त्यांना घरातच मधुमालती यांच्या कानातल्या टॉप्सच्या ठेप्या आढळून आल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी त्या ठेप्या जप्त केल्या. या हत्याकांडात सदस्यांचा हात असण्याचा संशय आहे.