शौचालय उभारणीत चांदूररेल्वे जिल्ह्यात अव्वल
By Admin | Updated: October 22, 2015 00:23 IST2015-10-22T00:23:02+5:302015-10-22T00:23:02+5:30
प्रत्येक गाव हगणदारीमुक्त व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या निर्मलग्राम स्वच्छता अभियान व स्वच्छ भारत ...

शौचालय उभारणीत चांदूररेल्वे जिल्ह्यात अव्वल
सुधारणा : ७७६९ कुटुंबांपैकी ४२६८ कुटुंबांकडे शौचालये
अमरावती : प्रत्येक गाव हगणदारीमुक्त व्हावे म्हणून महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या निर्मलग्राम स्वच्छता अभियान व स्वच्छ भारत मिशन अभियानाचा पुरेपूर लाभ चांदूररेल्वे तालुक्यातील नागरिकांनी घेतला आहे. येथील ७७६९ कुटंूबांपैकी ४२६८ कुटंूबांकडे शौचालय उभारणी झाली आहे. यासाठी लाखोे रुपयांच्या अनुदानाचे वाटप देखील करण्यात आले आहे.
कोणताही लाभार्थी अनुग्रह अनुदानापासून वंचित राहू नये, म्हणून यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतस्तरावर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुरेपूर दक्षता घेतली आणि या मोहिमेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. निर्मलग्राम स्वच्छता अभियानांतर्गत ४६०० रुपये प्रती व्यक्ती याप्रमाणे सानुग्रह अनुदानाचा लाभ तसेच स्वच्छ भारत मिशन अभियांतर्गत प्रत्येकी १२,००० रुपये सानुग्रह अनुदानवाटप करण्यात आले आहे.
या अनुषंगाने लाखो रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. गाव हगणदारीमुक्त व्हावे म्हणून शासनाने दोन वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत. तालुक्यात ७५ टक्के कुटूंबांनी शौचालयांची उभारणी केली आहे. उर्वरित उद्दिष्ट पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयाचे अनुदान मिळविण्यासाठी ३१ मार्च २०१६ पर्यंत मुदत आहे.
ज्या कुटूंबांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. त्यांनी शौचालय उभारणी करुन राष्ट्रीय कार्यक्रमास हातभार लावावा. अनुदानाचा लाभ घेऊन त्या रकमेचा नियोजित कामासाठी विनियोग करावा.
- संजय इंगळे ,
डेप्युटी सीईओ, पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद.