क्रेनचा टप डोक्यावर आदळला, मजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST2021-02-05T05:24:37+5:302021-02-05T05:24:37+5:30
शिरखेड पोलिसांत याप्रकरणी २३ जानेवारी रोजी दुपारी तक्रार दाखल झाल्यानंतर सदर प्रकार उघड झाला. धीरज राजेंद्र कुरवाडे असे मृताचे ...

क्रेनचा टप डोक्यावर आदळला, मजुराचा मृत्यू
शिरखेड पोलिसांत याप्रकरणी २३ जानेवारी रोजी दुपारी तक्रार दाखल झाल्यानंतर सदर प्रकार उघड झाला. धीरज राजेंद्र कुरवाडे असे मृताचे नाव आहे. तो तुळजापूर येथील जयकृष्ण छापाने यांच्या शेतातील विहिरीच्या कामावर मजुरीसाठी गेला होता. धीरज व त्याचा सोबती भूषण मारबते (रा. निंभार्णी) हे दोघे मलमा क्रेनच्या टपात भरून देण्याकरिता विहिरीत उतरले. तेव्हा अचानक क्रेनच्या टपाचा बोल्ट स्लिप होऊन मलम्याने भरलेला टप दोघांच्याही डोक्यावर आदळला. त्यात ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने तिवसा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. धीरज कुरवाडे याचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. मानसिक स्थिती अस्थिर नसल्याने व घरी शोकाकुल परिस्थिती असल्याने तक्रार नोंदविण्यास उशिर झाल्याचे मृताचे वडील राजेंद्र मोतीरामजी कुरवाडे यांनी तक्रारीत नमूद केले. तक्रारीवरून शिरखेड पोलिसांनी आरोपी राजेश काशीनाथ उमक (४०, रा. कमळापूर) याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०४ अ, ३३७ अन्वये गुन्हा दाखल केला.