तीन नगराध्यक्षपदांसाठी आज निवडणूक

By Admin | Updated: July 21, 2014 23:36 IST2014-07-21T23:36:51+5:302014-07-21T23:36:51+5:30

जिल्ह्यातील दहा पैकी तीन नगरपालिकांमध्ये २२ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच चार नगरपालिकांमध्ये केवळ एकच उमेदवारी अर्ज

Today's election for three municipal corporation | तीन नगराध्यक्षपदांसाठी आज निवडणूक

तीन नगराध्यक्षपदांसाठी आज निवडणूक

चार जागा अविरोध : उपाध्यक्ष पदासाठीची चुरस वाढली, राजकीय हालचालींना वेग
अमरावती : जिल्ह्यातील दहा पैकी तीन नगरपालिकांमध्ये २२ जुलै रोजी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशीच चार नगरपालिकांमध्ये केवळ एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने या चारही ठिकाणी नगराध्यक्षांच्या नावावर मंगळवारी शिक्कामोर्तब होणार आहे. दोन नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला न्यायालयाने स्थगनादेश दिल्याने या ठिकाणी निवडणूक होणार नाही. चिखलदरा नगरपरिषद वगळता सर्व नगरपालिकांमध्ये उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. या सर्व पालिकांमध्ये २२ जुलै रोजी मतदान होईल. यासाठी राजकीय नेत्यांसह प्रशासनानेही तयारी पूर्ण केली आहे.
दर्यापुरात उपाध्यक्षपदासाठी निवडणूक
दर्यापूर येथील नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवड २२ जुलै रोजी होणार आहे. एका स्वीकृत सदस्याचीही निवड केली जाईल. दर्यापुरात नगराध्यक्ष, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवर न्यायालयाचा स्थगनादेश आल्याने आता मंगळवारी केवळ उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवड केली जाईल.२० सदस्य संख्या असलेल्या दर्यापूर नगरपालिकेत काँग्रेस ९, नगरसुधार समिती ८, भाजप २ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. स्वीकृत सदस्य अशोकसिंह गहरवाल यांचे निधन झाल्याने स्वीकृत सदस्यांची निवड केली जाणार आहे. नगरपालिकेत काँग्रेस व नगरसुधार समितीच्या आघाडीची सत्ता होती. .
अंजनगावात आज ठरणार नगराध्यक्ष, उपाध्यक्ष
अंजनगाव-सुर्जी येथील नगराध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे, तर उपाध्यक्षपदासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरु आहे. नगराध्यक्षपदासाठी हनिफाबी मो. शरीफ व शिवसेनेतर्फे लक्ष्मी येऊल निवडणूक रिंगणात आहेत. येथे एकूण सदस्य संख्या २५ असून काँग्रेस ११, काँग्रेस बंडखोर ३, सेना ९ तर भाजप व अपक्ष प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. उपाध्यक्ष पदासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे. एकूणच राजकीय हालचालींना वेग आला आहे.त्याच प्रमाणे प्रशासनानेही मतदानासाठी तयारी पूर्ण केली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी सोहम वायाळ हे काम सांभाळतील.

Web Title: Today's election for three municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.