‘कॉफीटेबल बुक’चे आज दिमाखदार प्रकाशन
By Admin | Updated: June 8, 2017 00:03 IST2017-06-08T00:03:22+5:302017-06-08T00:03:22+5:30
‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ अमरावती, वर्धा, यवतमाळ’ या आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जेदार ‘कॉफी टेबल बुक’चा दिमाखदार प्रकाशन सोहळा...

‘कॉफीटेबल बुक’चे आज दिमाखदार प्रकाशन
‘आयकॉन्स आॅफ अमरावती, वर्धा, यवतमाळ
दिग्गजांची उपस्थिती : ‘लोकमत’चा उपक्रम
अमरावती : ‘लोकमत’च्या ‘आयकॉन्स आॅफ अमरावती, वर्धा, यवतमाळ’ या आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जेदार ‘कॉफी टेबल बुक’चा दिमाखदार प्रकाशन सोहळा गुरुवार, ८ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजता हॉटेल ग्रँड महेफिलच्या रूबी हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्याला वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि लोकमत समुहाचे चेअरमन विजय दर्डा हे उपस्थित राहतील.
या ‘कॉफीटेबल बुक’मध्ये अमरावती, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांच्या विविध क्षेत्रांतील प्रेरणादायी व्यक्तीमत्त्वांची सचित्र यशोगाथा एकत्रितपणे वाचता येणार आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये ‘आयकॉन’ असलेल्या व्यक्तींचा जीवनपट शब्दबद्ध करण्यात आला आहे.
उद्योग, व्यवसाय, शेती, समाजकार्य, शिक्षण, राजकारण, बांधकाम, वैद्यकीय अशा चौफेर क्षेत्रांत स्वत:चा आगळा ठसा उमटविणाऱ्या व्यक्तिंना या दर्र्जेदार ‘कॉफीटेबल बुक’मध्ये स्थान देण्यात आले आहे. उपस्थितांनी कायम आठवणीत ठेवावा, अशा या तारांकित श्रेणीच्या प्रकाशन सोहळ्याला तिन्ही जिल्ह्यांतील नामांकित व्यक्ती, प्रतिष्ठित नागरिक आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित राहतील.