टॉवर्सविरुद्ध आजपासून कारवाई
By Admin | Updated: January 24, 2015 00:03 IST2015-01-24T00:03:24+5:302015-01-24T00:03:24+5:30
महापालिका हद्दीत नियमाला छेद देऊन उभारण्यात आलेले १२८ मोबाईल टॉवर्स हटविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

टॉवर्सविरुद्ध आजपासून कारवाई
अमरावती : महापालिका हद्दीत नियमाला छेद देऊन उभारण्यात आलेले १२८ मोबाईल टॉवर्स हटविण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. त्याकरिता अद्ययावत क्रेन वापरली जात असून बडनेऱ्यातून या मोहिमेचा श्रीगणेशा केला जात आहे. शहरात केवळ २४ मोबाईल टॉवर महापालिका धोरणानुसार उभे आहेत, हे विशेष.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शासनाने ४ मार्च २०१४ रोजी मोबाईल टॉवरची उभारणी करताना नवीन नियमावली लागू केली आहे. या नियमावलीच्या अधीन राहूनच राज्यात टॉवर्सची उभारणी करावी लागणार आहे. त्याअनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मोबाील टॉवर्स उभारणी करण्याबाबतचे नवे धोरण धडकले आहेत. मात्र, मोबाईल कंपन्यांनी अधिकाऱ्यांच्या अभयाने टॉवर्स ‘जैसे थे’ ठेवण्यात यश मिळविले आहे.