आजपासून महिला शहरबस धावणार
By Admin | Updated: July 26, 2016 00:22 IST2016-07-26T00:22:52+5:302016-07-26T00:22:52+5:30
महानगरपालिकेच्या परिवहनमधील महिला शहर बससेवेचा मंगळवार २६ जुलै रोजी शुभारंभ होत आहे.

आजपासून महिला शहरबस धावणार
अमरावती : महानगरपालिकेच्या परिवहनमधील महिला शहर बससेवेचा मंगळवार २६ जुलै रोजी शुभारंभ होत आहे. महिला शहर बस लोकार्पण सोहळा मंगळवारी सकाळी ११ वाजता कार्यशाळा विभाग, प्रशांतनगर बगिचाजवळ आयोजित करण्यात आला आहे. शहर बससेवेचे लोकार्पण महापौर चरणजितकौर नंदा यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर शेख जफर शेख जब्बार, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, आयुक्त हेमंतकुमार पवार, सभागृह नेता बबलू शेखावत, विरोधी पक्षनेता प्रवीण हरमकर, गटनेता चेतन पवार, संजय अग्रवाल, प्रकाश बनसोड, श्रीमती गुंफाबाई मेश्राम, विधी समिती सभापती संगीता वाघ, शहर सुधार सभापती अर्चना राजगुरे, शिक्षण सभापती आरिफ हुसेन आदी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित राहतील. (प्रतिनिधी)