आज सूर्याचा मकर राशीत प्रवेश

By Admin | Updated: January 14, 2017 00:14 IST2017-01-14T00:14:53+5:302017-01-14T00:14:53+5:30

यंदा सूर्याचा धनू राशीतील मुक्काम लवकरच संपणार असून सूर्य १४ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे.

Today, the sun set in Capricorn | आज सूर्याचा मकर राशीत प्रवेश

आज सूर्याचा मकर राशीत प्रवेश

मकरसंक्रात : दक्षिणायन संपवून उत्तरायणाचा प्रवास
सुमित हरकुट चांदूरबाजार
यंदा सूर्याचा धनू राशीतील मुक्काम लवकरच संपणार असून सूर्य १४ जानेवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे. खरे तर प्रत्येक महिन्याला सूर्य आपली राशी बदलतो. डिसेंबरच्या १५ तारखेला सूर्य वृश्चिक राशीमधून धनू राशीत आला. राशीतील एका महिन्याच्या मुक्कामानंतर १४ जानेवारीला तो मकर राशीत प्रवेश करेल. या दिवसाला मकर संक्रात, असे संबोधले जाते.
पूर्वी दक्षिणायन थांबून सूर्याचा प्रवास उत्तरेकडे परत कधी वळतो, याची लोक वाट पाहात असत. मकर संक्रांतीला उत्तरायण सुरू होई. त्याचा आनंद म्हणून लोक तिळगूळ वाटून हा दिवस साजरा करीत असत. या दिवसापासून दिवस तिळा-तिळाने मोठा होत जाणार, असा संकेत आहे. परंपरेनुसार आजही आपण मकरसंक्रांत साजरी करीत असलो तरी आज तो दिवस उत्तरायणाच्या प्रारंभाचा नसतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
संक्रांत व उत्तरायणाच्या फारकतीस औद्योगिक किंवा सामाजिक क्रांती कारणीभूत नसून हे सर्व काही खगोलाशी संबंधित आहे. त्यासाठी सूर्याभोवती पृथ्वीची प्रदक्षिणा आणि दोन उत्तरायणमधला काळ यांच्यातील तफावत हे ते प्रमुख कारण होय.
इसविसनाच्या तिसाव्या शतकात राशी प्रचारात आल्यात. त्यावेळी मकरसंक्रांत आणि उत्तरायण यांचे ऐक्य होते. त्याकाळी सूर्याचा मकर राशीतील प्रवेश आणि त्याचे उत्तरेकडील प्रस्थान एकाच दिवशी होत असे. आता हे ऐक्य नाहिसे झाले आहे. मकर संक्रांत आणि पौष मास यांची मात्र पूर्वीपासूनच गट्टी आहे. हिंदू संस्कृतीतील वेगवेगळ्या पंचांगात आजही संक्रात ही वेगवेगळ्या तारखांना आलेली दिसून येते.

तीळ-गुळाची पोळी अन् सुगड्याचे वाण
महाराष्ट्रात तिळगुळाच्या पोळीचा नैवेद्य करून अन् सवाष्ण महिला सुगड्याचे पूजन करून सौभाग्याच्या दीर्घायुष्यासाठी पूजा करतात. त्यानंतर हळदी-कुंकाचे आयोजन करून वाण देण्याची प्रथा आहे.

Web Title: Today, the sun set in Capricorn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.