दारूबंदीसाठी तळेगाव ठाकूर येथे आज विशेष ग्रामसभा
By Admin | Updated: June 14, 2017 00:04 IST2017-06-14T00:04:55+5:302017-06-14T00:04:55+5:30
तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील देशी दारू दुकान बंद करण्याचा ठराव घेण्यासाठी उद्या बुधवारी स्थानिक कन्या विद्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे.

दारूबंदीसाठी तळेगाव ठाकूर येथे आज विशेष ग्रामसभा
लोकमत न्यूज नेटवर्क
तळेगाव ठाकूर : तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील देशी दारू दुकान बंद करण्याचा ठराव घेण्यासाठी उद्या बुधवारी स्थानिक कन्या विद्यालयात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
तळेगाव ठाकूर येथील दारू दुकान बंद करण्यात यावे यासाठी स्थानिक महिलांनी आंदोलन छेडले होते. अमरावती येथील पाण्याच्या टाकीवर चढून प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर विशेष ग्रामसभेत दारू दुकान बंद करण्याचा ठराव घ्यावा, अशा सूचना स्थानिक ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. या ग्रामसभेला तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, उत्पादन शुल्क विभावे अधिकारी, सरपंच उपस्थित राहणार आहेत. दारू दुकान बंद व्हावे, यासाठी महिला घरोघरी जाऊन जनजागृती करीत आहेत.
गावात एकूण २२०० महिला मतदार आहेत. दारू दुकान बंद करण्यासाठी ५० टक्के म्हणजे ११०० महिलांनी आडव्या बाटलीवर आवश्कता आहे. दुसरीकडे गावातील आंदोलक महिलांनी १७०० हून अधिक महिला उपस्थित राहणार असल्याचा दावा केला आहे. दारू दुकान बंद व्हावे, यासाठी महिला घरोघरी जाऊन महिलांचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या ग्राम सभेवरच या दुकानाचे भविष्य असेल.