आज चंद्राला ओवाळणार बहिणी

By Admin | Updated: November 1, 2016 00:21 IST2016-11-01T00:21:28+5:302016-11-01T00:21:28+5:30

गेली पुनवेची रात, आली भरात ग तीज चंद्र झोपडीत माझ्या ओवाळते भाऊबीज।

Today the sisters will wail the moon | आज चंद्राला ओवाळणार बहिणी

आज चंद्राला ओवाळणार बहिणी

भाऊबीज : बहिणीची संख्या दीडपट : १२ कुटुंबांनी घेतल्या मुली दत्तक
धामणगाव(रेल्वे) : गेली पुनवेची रात, आली भरात ग तीज चंद्र झोपडीत माझ्या ओवाळते भाऊबीज। या गीताने उद्या आपल्या भावांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून प्रत्येक बहीण भावाला ओवाळणार आहे. तालुक्यात मुलींची संख्या दीडपट वाढली आहे़
भाऊबीज हा दिवस शरद ऋतूतील कार्तिक मासातील द्वितीया असून द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे़ बिजेच्या कोरीप्रमाणे बंधू प्रेमाचे वर्धन रहावे ही त्यामागची भूमिका आहे़ ज्या समाजात आपण राहतो त्या समाजातील प्रत्येक महिलेचे सरंक्षण निर्भय पणे करू शकतील तो दिवस म्हणजे भाऊबीजेचा या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी तो जेवायला गेला म्हणून या दिवसाला यम द्वितीया असेही नाव मिळाले आहे़ या दिवशी नरकात पिचत पडलेल्या जीवांना त्या दिवसापुरते मोकळे करते, अशीही आख्यायिका आहे़ एखाद्या स्त्रीला भाऊ नसेल तर चंद्राला भाऊ म्हणून ओवाळून भाऊबीज साजरी करतात़
मुलींच्या संख्येत दीडपट वाढ
भाऊ बहिणीच्या अतूट स्रेहाची भाऊबीज असलेल्या या सणाच्या पार्श्वभूमिवर तालुक्यातील मुलींच्या जन्मदराची टक्केवारी लक्षात घेतली असता अधिक वाढली आहे़ एक हजार मुले तर १ हजार ४७० मुली तालुक्यात आहेत़ मुलींचा जन्मदर ग्रामीण भागातील जनजागृती व आरोग्य विभागाच्या सतर्कतेमुळे वाढला आहे़ धामणगाव तालुक्यात मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, निंबोली, अंजनसिंंगी हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र येतात़ गतवर्षी अधिक मुलींनी या नव्या जगात प्रवेश घेतला आहे़ ३७२ पैकी ११० मुले व २६२ मुली या वर्षात जन्मल्या़ विशेषत: शासकीय केंद्र उपकेंद्रात जन्म झालेल्यात मुलींची संख्या ९२ आहेत़ गर्भ लिंग निदान प्रतिबंध कायदा ज्या गर्भवती महिलांना पहिली मुलगी आहेत त्या महिलांकडे आरोग्य सेविकांच्यावतीने विशेष लक्ष देण्यात आले़ मुलापेक्षा मुलगी बरी असा संदेश आरोग्य विभागाने घरोघरी पोहोचविलात त्याची फलश्रुती मुलीचा जन्मदर वाढविण्यास झाली. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी विजय शेंडे, वैद्यकीय अधिकारी अशोक लांडगे, राजीव पाटील, रवींद्र डोंगरे यांच्यासह तालुक्यातील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक अथक परिश्रम सार्थ ठरले आहे़ (तालुका प्रतिनिधी)

पहिली बेटी
धनाची पेटी
वंशाच्या दिव्यापेक्षा मुलगीच यशदायी ठरतेय तीच खरी मोक्षाची अधिकारी आहे़ ती उभय मूल तारिणी आहे, हे सिध्द झाल्याने कुटुंबात पहिली मुलगी जन्माला आल्यानंतर तालुक्यातील जन्मदात्यांनी उल्हासाने स्वागत केले आहे़ बारा कुटुंबांनी मुलींनाच दत्तक घेतले आहे़ शासनाद्वारे राबविण्यात येत असलेल्या सुकन्या योजनेअंतर्गत तब्बल साडेचार हजार जन्मदात्यांनी आपल्या मुलीचे पोस्टात खाते उघडले आहे़ पहिली बेटी, धनाची म्हणजे जीवनमूल्याची पेटी या सकारात्मक उद्देशाने तालुक्यात मुली जन्मदारांच्या संख्येत वाढ झाली आहे़

Web Title: Today the sisters will wail the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.