आजपासून आरटीओचे आॅनलाईन कामकाज
By Admin | Updated: March 1, 2017 00:12 IST2017-03-01T00:12:29+5:302017-03-01T00:12:29+5:30
प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतलेले ४.० सारथी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

आजपासून आरटीओचे आॅनलाईन कामकाज
सुविधा : ४.० सारथी आॅनलाईन सेवा अद्ययावत
अमरावती : प्रादेशिक परिवहन विभागाने हाती घेतलेले ४.० सारथी सॉफ्टवेअर अपडेट करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. इंटरनेट कनेक्टिव्हीटीचा स्पीड वाढवण्यात येत आहे. बुधवार १ मार्चपासून नागरिकांना घरबसल्या अर्ज भरणे, अपॉइंटमेंट घेणे आदी कामे सारथीच्या माध्यमातून केले जाणार आहे.
परवान्यासाठी अर्ज, वाहन नोंदणी, परवान्याची कागदपत्रे आॅनलाईन सादर करणे, वाहन चाचणी, अपॉर्इंटमेंट घेता यावी, सर्व शुल्क भरणे यासह विविध सेवा सुविधा घरबसल्या करुन देण्यासाठी जुन्या सारथी ऐवजी ४.० सारथी सेवा अपडेट करण्याचे काम सद्या प्रादेशिक परिवहन विभागात सुरू आहे.
वाहन सॉफ्टवेअर प्रणाली कार्यान्वित केली आहे. परीक्षेसाठी अर्ज करून तारीख घेणे, पक्का परवाना, नुतनीकरण, दुय्यम परवाना, परवान्यासंदर्भातील इतर माहिती आॅनलाईन करण्यात आली आहे. यापूर्वीच्या स्रं१्र५ंँंल्ल.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटवर जावे आॅनलाईन सर्व्हीस+सारथी सर्व्हीसवर जावे त्यानंतर आॅनलाईन अपॉइंटमेंट, अपलोड डाक्युेंट अपॉइंटमेंट, फ्री पेमेंट असे आपल्याला हवे तसे आॅप्शन निवडता येतील. आॅनलाईन अपॉर्इंटमेंट शिकाऊ व पक्क्या परवान्यासाठी अर्ज करता येईल. अशा प्रकारच्या अद्ययावत सुविधा घरबसल्या मिळणार आहे. यात काही अडचणी आल्यास प्रादेशिक परिवहन विभागाशी संपर्क करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीपाद वाडेकर व एआरटीओ विजय काठोळे यांनी केले आहे.
काय होणार फायदा?
आरटीओतील गर्दी कमी होणार आहे. दलालांना चाप बसेल नागरिकांची लूट थांबण्यास मदत होईल, कामकाजात पारदर्शकता येईल, भ्रष्टाचारालाही आळा बसेल, डेडलाईनप्रमाणे कामे होतील.