आजपासून १२ रुपयांत दोन लाखांचा विमा
By Admin | Updated: May 9, 2015 00:21 IST2015-05-09T00:21:05+5:302015-05-09T00:21:05+5:30
पंतप्रधान जीवनज्योती तसेच सुरक्षा विमा योजनेचे शनिवार ९ मे रोजी लोकार्पण होत आहे. केंद्र शासनाच्या या ..

आजपासून १२ रुपयांत दोन लाखांचा विमा
प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना : जिल्ह्यात १३ लाख नागरिकांना मिळणार लाभ
अमरावती : पंतप्रधान जीवनज्योती तसेच सुरक्षा विमा योजनेचे शनिवार ९ मे रोजी लोकार्पण होत आहे. केंद्र शासनाच्या या योजनेत एका वर्षासाठी १२ रुपयांमध्ये दोन लाख रुपयांच्या विम्याचा लाभ मिळणार यासाठी वयाची १८ ते ७० ही कालमर्यादा आहे. जिल्ह्यातील १९ बँकांना याबाबत खातेदार करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात किमान १२ ते १३ लाख नगारिकांना या योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने बँकांच्या मदतीने विमा योजना सुरु केली आहे. याच योजनेअंतर्गत ३३० रुपयांमध्ये एक वर्षाचा विमा देण्याची योजना आहे यामध्ये ज्यांचे वय १८ ते ५० वर्षे आहे. अशा सर्व बचत खातेदारांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच खातेदारांच्या पश्चात कुटुंबीयांना विमा रक्कम मिळणार आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत वार्षिक प्रीमियम फक्त १२ रुपयांमध्ये दोन लाख रुपयांचा अपघात विमा आहे. सर्व बचत बँक खातेधारकांसाठी ही योजना आहे. विम्यात अपघातामुळे येणाऱ्या कायमस्वरुपी अपंगात्वाचाही समावेश करण्यात आला आहे. नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरदेखील दोन लाख रुपये मिळणार आहेत. यासाठीदेखील वयोमर्यादा १८ ते ७० आहे. दुसऱ्या योजनेत ३३ रुपयांमध्ये आजारपणात मृत्यू झाल्यास चार लाख रुपयांची मदत केंद्र शासनाकडून मिळणार आहे.
१७ बँकांना
दिले उद्दिष्ट
सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षा कवच मिळावे यासाठी केंद्र शासनाने ही योजना सुरु केली आहे. यासाठी जिल्ह्यातील १७ बँकांना उद्दिष्ट देण्यात आले आहे. १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ असा विम्याचा कालावधी राहणार आहे. यासाठी सर्वच बँकांनी पुढाकार घेतला आहे. बँकाद्वारा अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जिल्ह्यातील किमान १२ लाख नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.
जिल्ह्यात शनिवारी लोकार्पण
अटल पेंशन योजनेअंतर्गत प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजनेचा जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी बचत भवन येथे आयोजित कार्यक्रमात लोकार्पण होणार आहे. पालकमंत्री प्रवीण पोटे खा. आनंदराव अडसूळ, आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
सेंट्रल बँकेद्वारा नोंदणी शिबिर
या विमा योजनांकरिता सेंट्रल बँकेद्वारा शहरात नोंदणी शिबिर घेण्यात आले. यावेळी योजनेची माहिती नागरिकांना देण्यात आली. प्रत्येक नागरिकांनी बचत खाते उघडून योजनेचा लाभ घ्यावा, असे अवाहन सहायक महाप्रबंधक संजय देवरस व अग्रणी बँकेचे जिल्हा प्रबंधक ए.बी. खोरगडे यांनी केले.