आज रक्षाबंधन, लाखोंच्या उलाढालीने बाजारपेठेत चहपहल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:15 IST2021-08-22T04:15:37+5:302021-08-22T04:15:37+5:30

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हिंदूंचा पवित्र सण रक्षाबंधन देशभर साजरा केला जातो. या उत्सवाला पर्शियन भाषेत स्लोनो म्हणून ओळखले ...

Today, Rakshabandhan, with a turnover of lakhs, is in full swing in the market | आज रक्षाबंधन, लाखोंच्या उलाढालीने बाजारपेठेत चहपहल

आज रक्षाबंधन, लाखोंच्या उलाढालीने बाजारपेठेत चहपहल

श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हिंदूंचा पवित्र सण रक्षाबंधन देशभर साजरा केला जातो. या उत्सवाला पर्शियन भाषेत स्लोनो म्हणून ओळखले जाते. याचा अर्थ वर्षाचा नवीन दिवस. या दिवशी बहिणी भावाला राखी बांधून त्याच्या सुख-समृद्धीची कामना करते. ही राखी प्रत्येक संकटात आणि अडचणीत त्याचे रक्षण करो. महाराष्ट्रात या सणाच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण केले जाते. म्हणून या दिवसाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी नारळ फोडून नवीन कामाचा आरंभ करणे शुभ मानले जाते. पारशी लोक या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात आणि जल देवतांची प्रार्थना करतात.

आपल्या प्रत्येक सामाजिक आणि धार्मिक विधींशी नारळाचा संबंध आहे.

बॉक्स

डिझाईनच्या राख्यांकडे तरुणींचा कल

पौराणिक राख्यांना आता मागणी कमी झाली असून, नवीन डिझाईनच्या राख्यांकडे तरुणींचा कल दिसून येत आहे. मनगटावर लहान आकाराची आकर्षक डिझाईन असलेल्या राख्यांना अधिक पसंती असून, त्यांचे दरदेखील वाढलेले आहेत.

कोट

यंदा नवीन डिझाईनच्या राख्यांना विशेष मागणी दिसत आहे. राखी बनविण्याचे साहित्यासह रेशीम महागल्याने यंदा राख्यांचे दरही वाढले आहे. तरीदेखील खरेदी वाढल्याने मार्केटमध्ये चहलपहल आहे.

- शिवम चांदूरकर, राखी विक्रेता

Web Title: Today, Rakshabandhan, with a turnover of lakhs, is in full swing in the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.