आजपासून सीईटीसाठी आॅनलाईन नोंदणी
By Admin | Updated: March 1, 2016 00:10 IST2016-03-01T00:10:23+5:302016-03-01T00:10:23+5:30
अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या ५ मे रोजी होणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी’साठी आॅनलाईन नोंदणी मंगळवारपासून सुरू होत आहे.

आजपासून सीईटीसाठी आॅनलाईन नोंदणी
५ मे रोजी परीक्षा : पदवी अभ्यासक्रमांची परीक्षा
अमरावती : अभियांत्रिकी औषध निर्माणशास्त्र व वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या ५ मे रोजी होणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी’साठी आॅनलाईन नोंदणी मंगळवारपासून सुरू होत आहे.
या परीक्षेसाठी आॅनलाईन नोंदणी अनिवार्य आहे. नोंदणी प्रक्रियेसंदर्भात सर्व माहिती वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. परीक्षेच्या नोंदणीसाठी १ ते २२ मार्च या कालावधीत विद्यार्थ्यांना परीक्षेचे अर्ज आॅनलाईन भरता येणार आहेत.
राज्यातील विविध अभियांत्रिकी, औषधी निर्माणशास्त्र आणि वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयाच्या प्रत्येकी ५० गुणांच्या प्रश्नपत्रिका सामायिक राहणार आहेत. जीवशास्त्र या विषयाची १०० गुणांची प्रश्नपत्रिका राहणार असून प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. बारावी अभ्यासक्रमाच्या धर्तीवर ही सीईटी होणार असल्याने राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. (प्रतिनिधी)