आजपासून नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी
By Admin | Updated: October 24, 2016 00:08 IST2016-10-24T00:08:43+5:302016-10-24T00:08:43+5:30
जिल्ह्यात येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान...

आजपासून नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी
प्रक्रिया सुरू : नामनिर्देशन अर्ज स्वीकृती २९ आॅक्टोबरपर्यंत
अमरावती : जिल्ह्यात येत्या २७ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेचे पालन करून भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले आहे.
नगरपरिषद निवडणुकीत प्रथमच नामनिर्देशन पत्रे आॅनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे २४ ते २९ आॅक्टोबरपर्यंत वाजेपर्यंत दाखल करता येणार आहे. २ नोव्हेंबरला प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी होेईल, नंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. नामनिर्देशन मागे घेण्यासाठी ११ नोव्हेंबर आहे. १२ नोव्हेंबरला उमेदवारांना चिन्हे वाटप करण्यात येणार आहे. २७ नोव्हेंबरला सकाळी ७.३० ते दुपारी ५.३० या दरम्यान मतदान करण्यात येणार आहे आणि २८ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. (प्रतिनिधी)
खर्चावर राहणार प्रशासनाची नजर
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि नगरपालिका दर्जानुसार नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदासाठी निवडणुकीकरिता असलेल्या खर्च मर्यादेवर आणि सादरीकरणावर प्रशासकीय नजर राहणार आहे. यात कुचराई करणाऱ्यावर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
जिल्हाधिकारी
कार्यालयात विशेष कक्ष
नगरपालिका निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा गोंधळ होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एकखिडकी योजना सुरू केली जाईल. याठिकाणी निवडणुकीसाठी आवश्यक माहिती दिली जाणार आहे.
आयोगाच्या सूचनेप्रमाणे आवश्यक तयारी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून केली आहे. निवडणुकीसाठी सोमवार पासून नामनिर्देशन स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज आहे.
- किरण गित्ते,
जिल्हाधिकारी, अमरावती