आज भगवान महावीर जयंती
By Admin | Updated: April 9, 2017 00:19 IST2017-04-09T00:19:57+5:302017-04-09T00:19:57+5:30
तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे जैन संघटनेच्या वतीने भगवान महावीर जयंतीदिनी रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

आज भगवान महावीर जयंती
शिरजगाव : तिवसा तालुक्यातील शिरजगाव मोझरी येथे जैन संघटनेच्या वतीने भगवान महावीर जयंतीदिनी रविवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
महावीर जयंतीच्या कार्यक्रमांना सकाळी ध्यान, महावीर स्तवन वाचन, जाप व नमो अरिहंतानमचा जप, सायंकाळी सामुदायिक प्रार्थना व महावीर भगवान यांच्या कार्यावर भाषण होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात येईल. अखिल भारतीय सेवा मंडळाचे जीवन प्रचारक मेघराज कोचर, नेमिचंद कोचर, पन्नालाल कोचर, नवीन कोचर, सुशीला कोचर, कांताबाई कोचर अनुश्री कोचर, अपूर्वा कोचर व गावातील मंडळी सहभागी होतील.
संत महोत्सव : ४ एप्रिलपासून येथे संत मोहत्सवाचे अयोजन करण्यात आले आहे. यात रामनवमी, साईबाबा, भगवान महावीर, ग्रामजयंती, सूरदार महाराज व हनुमान जयंतीचे कार्यक्रम आयोजिले आहेत. यात हभप. वंदना माहोरे या संगीतमय भागवत कथेचे वाचन करीत आहेत. दैनंदिन कार्यक्रमात काकडा, ध्यान, आरती, ग्रामगीता पारायण, सामुदायिक प्रार्थना हरिपाठ, भागवत कथा व भजन मंडळीचे गायन याचा समावेश आहे. कार्यक्रमासाठी हभप नीलेश मोहरकर, अनंत सुर्तकर, दीपक पुणेकर, अंकुत तायडे, सुमित मेश्राम आदी प्रयत्न करीत आहेत.