विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षांचा आज शेवटचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2020 05:00 AM2020-11-02T05:00:00+5:302020-11-02T05:00:18+5:30

सर्वोच्च न्यायालय, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. ३८६ पैकी ३४७ महाविद्यालयांत या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन प्रणालीने घेण्यात आल्या आहेत. सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. गुगल फाॅर्मवर प्रश्नपत्रिका विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींनी परीक्षा केंद्रांवर भेटी देत विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. 

Today is the last day of university final year exams | विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षांचा आज शेवटचा दिवस

विद्यापीठ अंतिम वर्ष परीक्षांचा आज शेवटचा दिवस

Next
ठळक मुद्देपर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी

n  लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठमार्फत २६ ऑक्टोबरपासून प्रारंभ झालेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा सोमवार, २ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे. विद्या परिषदेच्या निर्णयानुसार महाविद्यालय स्तरावर परीक्षांचे संचालन करण्यात आले आहे. गत सात दिवसांत पदवी, पदव्युत्तर  विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरळीत घेण्यात आल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालय, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. ३८६ पैकी ३४७ महाविद्यालयांत या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन प्रणालीने घेण्यात आल्या आहेत. सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. गुगल फाॅर्मवर प्रश्नपत्रिका विद्यार्थांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कुलगुरू मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू राजेश जयपूरकर, कुलसचिव तुषार देशमुख, अधिष्ठाता एफ.सी. रघुवंशी, अविनाश मोहरील आदींनी परीक्षा केंद्रांवर भेटी देत विद्यार्थ्यासोबत संवाद साधला. 
पर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी
पर्यावरण अभ्यासक्रमाच्या परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते ९ वाजता परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. पयार्वरण अभ्यासक्रमाची परीक्षा अनुत्तीर्ण झाले असतील, अशांनाही विद्यार्थ्यांना ही अंतिम वर्षाची परीक्षा देता येईल. बहुपर्यायी प्रश्नपत्रिका प्राचार्यांच्या ई-मेल आयडीवर पाठविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी दिली.

२७२८२ शनिवारी विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. अंतिम वर्षाचे २७ हजार २८२ विद्यार्थ्यांनी शनिवारी सुटीच्या दिवशी परीक्षा दिली आहे. यात १४११० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, तर १३ हजार १७२ ऑनलाईन परीक्षा दिली आहे. एकूण ६१३ परीक्षा घेण्यात आल्या असून, ९७.८० टक्के उपस्थिती नाेंदविण्यात आली आहे.

मोर्चे, आक्षेपानंतरही परीक्षा ‘सुरळीत’ 
विद्यपीठाने अंतिम वर्षाच्या परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्याच्या निर्णयाविरुद्ध गत आठवड्यात विविध विद्यार्थी संघटनांनी मोर्चा काढला. शिक्षक संघटनांनी आक्षेप नोंदविले. बहि:शाल विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. तथापि, या परीक्षेत कोणताही खंड न पडता ३७४ महािवद्यालयांत परीक्षा ‘सुरळीत’पणे घेण्यात आल्या आहेत. एकाही परीक्षा केंद्रावर तक्रार न उद्‌भवता सोमवारी अंतिम वर्षाच्या परीक्षा पार पडणार आहे. पदवी, पदव्युत्तर विद्यार्थी निर्धोकपणे परीक्षांना सामोरे गेले आहेत.

Web Title: Today is the last day of university final year exams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.