१,२६८ कोटींचे कर्ज थकीत

By Admin | Updated: April 9, 2017 00:02 IST2017-04-09T00:02:08+5:302017-04-09T00:02:08+5:30

सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत.

Tired of Rs 1,268 crores loan | १,२६८ कोटींचे कर्ज थकीत

१,२६८ कोटींचे कर्ज थकीत

कर्जमाफी केव्हा ? : दोन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा
अमरावती : सलगचा दुष्काळ, नापिकीने शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडले आहेत. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, यासाठी विरोधी पक्षांनी रान उठविले. सातबारा कोरा होणार, या प्रतीक्षेत जिल्ह्यात ३१ मार्चअखेर दोन लाख तीन हजार शेतकऱ्यांकडे १२६७ कोटी रूपयांचे पीककर्ज थकीत आहे. त्यामुळे यंदाच्या खरिपासाठी कर्ज उपलब्ध होण्यास शेतकऱ्यांना अडसर निर्माण होणार आहे.
उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांची कर्जमाफीनंतर राज्यातदेखील याच निर्णयाची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. मागील तीन वर्षांच्या दुष्काळानंतर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले व नव्याने कर्ज देण्यात आले.
मागील खरीप हंगामात सोयाबीनचे समाधानकारक उत्पादन झाले. मात्र हमीपेक्षा कित्येक पट कमी अशा दोन हजार रूपये क्विंटल दराने सोयाबीनची खरेदी व्यापाऱ्यांनी केली.
रबीमध्ये तुरीचीदेखील हीच अवस्था आहे. उत्पादन खर्चदेखील निघाला नाही. अधिक झालेले उत्पन्न शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे. अशा परिस्थितीत सर्वच पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासनाला धारेवर धरले आहे. सभागृहात व सभागृहाबाहेर तसेच गावागावांत आता कर्जमुक्तीसाठी संघर्ष इरेला पेटला असल्याने शेतकऱ्यांनीदेखील कर्ज माफ होईल, या आशेने कर्जाचा भरणा केला नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात थकीत झाले आहे. कर्जमाफी न झाल्यास किंवा यावर शासनाने तोडगा न काढल्यास येत्या हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचणी उत्पन्न होणार आहे. (प्रतिनिधी)

रबीत कर्जवाटपच नाही
रबी हंगामासाठी जिल्ह्यास ३८६ कोटी २२ लाख रूपयांचे लक्ष्यांक आहे. यामध्ये शेतकऱ्यांची म्हणविणाऱ्या जिल्हा बँकेस १२५ कोटी ४२ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटपाचा टक्का निरंक आहे. तसेच ग्रामीण बँकांना २ कोटी १६ लाख रूपयांचे लक्षांक असताना वाटप शून्य टक्के आहे. केवळ राष्ट्रीयीकृत बँकांनी २६० कोटींचे कर्जवाटप केले आहे.

शेतकऱ्यांकडे १२६८ कोटींचे पीक कर्ज थकीत आहे. शासनाला यापूर्वीच अहवाल सादर केला आहे. थकीत कर्जामुळे नव्याने कर्ज मिळण्यास अडचणी निर्माण होणार आहे. याविषयी शासनाला मार्गदर्शन मागितले आहे.
- गौतम वालदे, जिल्हा उपनिबंधक

Web Title: Tired of Rs 1,268 crores loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.