उधळला शेतकऱ्याचा विष प्राशनाचा डाव
By Admin | Updated: June 21, 2015 00:22 IST2015-06-21T00:22:54+5:302015-06-21T00:22:54+5:30
खचलेल्या सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी योेजनेंतर्गत पूर्ण केल्यानंतरही अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ...

उधळला शेतकऱ्याचा विष प्राशनाचा डाव
खळबळ : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात गोंधळ
अमरावती : खचलेल्या सिंचन विहिरींची कामे रोजगार हमी योेजनेंतर्गत पूर्ण केल्यानंतरही अनुदान देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन सुरू असताना संतप्त शेतकऱ्याने खिशातून विषाची बाटली काढून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्याचा हा डाव उधळून लावला.
अनुदान देण्यास विलंब का, असा सवाल प्रशासनाला विचारण्याकरिता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू होते. यावेळी वरूड तालुक्यातील टेंब्रुसोंडा येथील शेतकरी वामन संपत थेटेदेखील उपस्थित होते.
लेखी आश्वासनानंतर माघार
जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर सलग दोन तास ठिय्या आंदोलन केल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, रोहयोचे उपजिल्हाधिकारी आर.डी. काळे आदींनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे लेखी पत्र दिले. या आश्वासनानंतर शेतकऱ्यांचे हे आंदोलन मागे घेण्यात आले.