तिवस्यात टायरचे शोरूम फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:17 IST2021-06-16T04:17:49+5:302021-06-16T04:17:49+5:30

-2 अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद तिवसा : रविवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील टायरचे शोरूम अज्ञातांनी फोडले. ...

The tire showroom exploded in Tivas | तिवस्यात टायरचे शोरूम फोडले

तिवस्यात टायरचे शोरूम फोडले

-2 अज्ञात चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद

तिवसा : रविवारी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्गावरील टायरचे शोरूम अज्ञातांनी फोडले. तेथून २ लाख २४ हजार रुपये किमतीचे १४ टायर्स चोरून नेले. विशेष म्हणजे हे चोर एक तास शोरूममध्ये चोरी करून वाहनात टायर भरत होते.

रामभाऊ बोकाडे यांचे तिवसा येथील राष्ट्रीय महामार्गावर नामांकित कंपनीचे शोरूम आहे. या शोरूमच्या बाजूला अज्ञातांनी रविवारच्या रात्री १.४५ च्या सुमारास वाहन उभे केले. त्यानंतर बाहेरील सीसीटीव्ही कॅमेराचे वायरिंग तोडले व शोरूमचे सेंटर लॉक फोडून आत प्रवेश केला. तेव्हा चक्क आतील सीसीटीव्ही कॅमेरात तासाभरात त्यांनी तेथून लहान मोठे असे एकूण १४ टायर्स एक-एक करीत बाहेर काढून वाहनात भरले. याप्रकरणी तिवसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: The tire showroom exploded in Tivas