शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी दिल्या टिप्स
By Admin | Updated: May 6, 2015 00:28 IST2015-05-06T00:28:16+5:302015-05-06T00:28:16+5:30
राज्यात शिक्षणाचा शैक्षणीक स्तर खालावला असल्याने ही स्थिती सुधारण्यासाठी भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी ..

शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांनी दिल्या टिप्स
गुणवत्ता वाढीवर भर : मुलींच्या गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन
अमरावती : राज्यात शिक्षणाचा शैक्षणीक स्तर खालावला असल्याने ही स्थिती सुधारण्यासाठी भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या सुचनेव्दारे सध्या शिक्षण विभाग चांगलाच कामाला लागला आहे. या अनुषंगाने मंगळवारी राज्याच्या शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी अमरावती गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व निवडक शिक्षक यांची जिवन विकास संस्थेच्या सभागृहात कार्यशाळा घेवून जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण, ढासळलेली शैक्षणीक गुणवत्ता सुधारण्यासाठी सोशल मिडीया व नव तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचा सल्ला चांगल्या कामासाठी कशा प्रकारे होवू शकतो याची माहिती यावेळी उपस्थितांना दिली. शिक्षण विभागाची शैक्षणीक गुणवत्ता ढासळला असल्याचा ठप्पका असरच्या अहवालात ठेवण्यात आला आहे.या अहवालानुसार सध्या जिल्हा परिषद शाळेतील मुलींच्या गळतीचे प्रमाण २१ टक्के एवढे नोंदविण्यात आले आहे. हे प्रमाण पाच टक्यापेक्षाही कमी करावे, तसेच याच अहवालात शालेय शिक्षणाचा शैक्षणीक स्तर ढासळल्याचा ठप्पका सुध्दा ठेवण्यात आल्याने ही बाब राज्याच्या दुष्टीने भूषणावह नाही. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद शाळेची ढासळलेली गुणवत्ता सुधारावी, मुलींच्या गळतीचे प्रमाण थांबवावे अशा स्पष्ट सुचना मुख्यमंत्री फडणविस यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणीक गुणवत्ता वाढविणे, मुलींच्या गळतीचे प्रमाण रोखणे यासाठी राज्याच्या शिक्षण विभागापासून तर ग्रामिण भागात पर्यत शिक्षण विभाग जोमाने कामाला लागला आहे. यासाठी आवश्यक ते नवनविन उपक्रम राबविण्याच्या सुचना प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षण विभागाला विल्या आहेत. यावेळी प्रधान सचिवांनी उपस्थितांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्या.