दर्यापुरात विषाणूजन्य तापाची लागण
By Admin | Updated: September 13, 2014 00:52 IST2014-09-13T00:52:23+5:302014-09-13T00:52:23+5:30
मागील आठवड्यात तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे तालुक्यात विषाणूजन्य तापाची ....

दर्यापुरात विषाणूजन्य तापाची लागण
संदीप मानकर दर्यापूर
मागील आठवड्यात तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे तालुक्यात विषाणूजन्य तापाची साथ पसरली असून उपजिल्हा रुग्णालयासोबत शहरातील २५ खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत.
या आठवड्यात तापाने फणफणत असलेल्या ८० रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासल्यास त्यांना टायफाईडची व मलेरियाची लागण आहे का ? हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
आॅगस्ट महिन्यात ‘व्हायरल इन्फेक्शन’ने बाधित उपजिल्हा रुग्णालयात एकूण ६ हजार ६९३ रुग्णांनी तपासणी करुन घेतली. तर सप्टेंबर महिन्यात फक्त १२ दिवसांत १५२९ रुग्णांनी तपासणी केली आहे, तर आठवडाभरात ४०० पेक्षा जास्त भागातून आलेले गुरुवारी सर्वाधिक ५१६ रुग्णांची ओपीडी बाह्यरुग्ण तपासणी झाली आहे. ५० खाटांची क्षमता असताना दररोज ५० च्यावर रुग्ण भरती होत आहेत.