वाजत-गाजत आले गणराया

By Admin | Updated: September 6, 2016 00:07 IST2016-09-06T00:07:34+5:302016-09-06T00:07:34+5:30

‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयजयकाराने सोमवारी शहर दुमदुमले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी अमरावतीकरांचे लक्ष वेधले होते.

At the time Ganaraya came in the morning | वाजत-गाजत आले गणराया

वाजत-गाजत आले गणराया

मिरवणुकींनी दुमदुमले शहर : ५५२ मंडळांकडून प्रतिष्ठापना
अमरावती : ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयजयकाराने सोमवारी शहर दुमदुमले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या भव्य मिरवणुकांनी अमरावतीकरांचे लक्ष वेधले होते. घरोघरी गणपतीची प्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. यंदा शहरात ५५२ गणेशांचे शानदार स्वागत करण्यात आले.
यंदाही महिनाभरापूर्वी गणेश स्थापनेची उत्सुकता पाहायला मिळाली. शहरातील बाजारपेठाही सजल्या होत्या. सोमवारी गणेश स्थापनेचा दिवस उजाडताच भाविकांची लगबग सुरू झाली. घरोघरी बच्चे कंपनीपासून तर वयोवृध्द मंडळींमध्ये गणरायाच्या स्वागताची उत्सुकता लागली होती. गल्ली बोळातून ढोलताशांचा आवाज गुंजले, तर मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांनी भव्यदिव्य मिरवणूक काढून अमरावतीकरांचे लक्ष वेधले. गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा, ढोलताशांचा गजर, आतषबाजीमध्ये गणेशाचे स्वागत करण्यात आले. (प्रतिनिधी)

पोलिसांचा चोख बंदोबस्त
शहरातील विविध सार्वजनिक मंडळांनी सोमवारी उत्साहात गणेश स्थापनेला सुरुवात केली. भव्यदिव्य मिरवणूक काढून गणेशाचे स्वागत केले. यादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामध्ये राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या, जालना व नागपूर येथील प्रशिक्षणार्थी, ३५० पुरुष होमगार्ड, ५० महिला होमगार्ड, तसेच नागपूर येथील पीटीएसमधून एक पोलीस निरीक्षक व दोन पीएसआय यांचा सहभाग होता.

२५ ठिकाणी विक्री
शहरात २५ ठिकाणी गणेश मुर्तींची विक्री करण्यास पोलीस परवानगी देण्यात आली. त्यामध्ये फे्रजरपुरा २, नांदगाव पेठ १, बडनेरा १२, राजापेठ ५, कोतवाली ३, खोलापुरी गेट ३, भातकुली ४, गाडगेनगर ४ व वलगाव १ या ठिकाणांचा सहभाग आहे. नेहरू मैदान, सायंस्कोर मैदान, राजापेठ या ठिकाणी गणेश खरेदीकरिता सर्वाधिक गर्दी झाली होती.

Web Title: At the time Ganaraya came in the morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.