शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

बंजारा समाजाच्या तीज उत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 01:19 IST

श्रावणात बंजारा समाजाच्या 'तीज' या सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी उत्साहात समारोप झाला. स्त्रिया व मुलींनी हिरीरीने सहभाग घेत मृत्याचा फेर धरला. यामध्ये खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर यांनी सहभाग नोंदविला, हे विशेष.

ठळक मुद्देपारंपरिक महोत्सव : शहरातील हजारो बांधवांसह भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : श्रावणात बंजारा समाजाच्या 'तीज' या सांस्कृतिक महोत्सवाचा रविवारी उत्साहात समारोप झाला. स्त्रिया व मुलींनी हिरीरीने सहभाग घेत मृत्याचा फेर धरला. यामध्ये खासदार नवनीत राणा, आमदार यशोमती ठाकूर यांनी सहभाग नोंदविला, हे विशेष.‘मनं लोवडी दरादरे वीर, आज म चाली रे...’ या गाण्याच्या ओळी मनाला चटका लावून गेल्या. आता आपण पुन्हा वर्षभर भेटणार नाही, ही विरहाची जाणीव तर पुन्हा भेटीची उत्कटता त्यातून व्यक्त होते. शहरात वेगवेगळ्या भागातून नोकरी, व्यवसाय व शिक्षणाकरिता स्थायिक झालेला बंजारा समाज आपले सांस्कृतिक वेगळेपण आजही जपत आहे. तांड्याचे प्रमुख नायक प्रल्हाद चव्हाण, राम पवार यांच्या मार्गदर्शनात १७ आॅगस्ट रोजी तीज महोत्सवाला प्रारंभ झाला.त्यानंतर साईनगर, गोपालनगर, शंकरनगर, अर्जुननगर, व्हीएमव्ही परिसर, रविनगर व मंगलधाम परिसर या भागात आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात शहरातील शेकडो महिला व मुली सहभागी झाल्यात. या कालावधीत शहरातील बंजारा बांधव आनंदाने भारून गेले होते. गायीगुरांचे पालन करणाºया बंजारा समाजात श्रीकृष्णांची श्रद्धेने पूजा केली जाते. २४ आॅगस्ट रोजी गणगौर, ढंबोळीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी श्रीकृष्ण व राधेची पूजा करून पारंपरिक नृत्य-गाणे यांनी वातावरण मंगलमय झाले होते.२५ आॅगस्ट २०१९ रोजी विद्यापीठ मार्गावरील संस्कार लॉन आणि दस्तूरनगर स्थित कमल प्लाझा येथे या उत्सवाची सांगता झाली. खासदार नवनीत राणा व आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय राठोड, एम.एच. राठोड आदी उपस्थित होते.व्यासपीठावर प्राचार्य अमरसिंग राठोड, महानगर तांडा नायक राम पवार, प्रल्हाद चव्हाण, चंदनसिंग राठोड, प्राचार्य जयंत वडते, प्राचार्य विजय राठोड, जयसिंग राठोड, उपकुलसचिव प्रवीण राठोड, उपकुलसचिव दादाराव चव्हाण, दयाराम राठोड, ज्ञानेश्वर राठोड, मोतीलाल जाधव, अजाबराव राठोड, कारभारी हिरालाल जाधव, प्राचार्य पंडित राठोड, रणजित चव्हाण, नामदेव जाधव, विजय आडे, हरीश राठोड, श्रावण जाधव, रमेश राठोड, नामदेव आडे आदी मान्यवर उपस्थित होते.