टायफाईडचे ४३६ तर तापाचे १३०६
By Admin | Updated: November 4, 2015 00:21 IST2015-11-04T00:21:48+5:302015-11-04T00:21:48+5:30
जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले असून आॅक्टोबर महिन्यातील चार आठवड्यात विविध आजाराच्या २१ हजार ८७२ रुग्णांवर इर्विन रुग्णांलयात उपचार करण्यात आले.

टायफाईडचे ४३६ तर तापाचे १३०६
चार आठवड्यांचा अहवाल : विविध आजारांच्या २९ हजार ६०५ रुग्णांवर उपचार
अमरावती : जिल्ह्यात साथरोगाने थैमान घातले असून आॅक्टोबर महिन्यातील चार आठवड्यात विविध आजाराच्या २१ हजार ८७२ रुग्णांवर इर्विन रुग्णांलयात उपचार करण्यात आले. त्यामध्ये टायफाईडचे ४३६ पॉझिटिव्ह तर तापाचे १३०६ रुग्ण असल्याचे आढळून आले आहे.
दूषित पाणी, बदलते वातावरण व पावसाची अनियमीततेमुळे जिल्ह्यात साथरोगांचे प्रमाण वाढत आहे. बहुतांश नागरिक दूषित पाणी पीत असल्यामुळे टायफाईडचे प्रमाण वाढले आहे. शासकीय आरोग्य प्रयोग शाळेत जिल्ह्यातील पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. त्यामध्ये दरमहिन्याला १५ ते २० टक्के पाणी नमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे. अस्वच्छता व डासांचा प्रादुर्भाव वाढल्यानेमुळे विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. १ ते २५ आॅक्टोबरदरम्यान जिल्हा सामान्य रुग्णालयात तब्बल २९ हजार ६०५ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी बहुतांश किरकोळ रुग्णांनी उपचार करुन सुट्टी देण्यात आली आहे. टायफाईड, ताप, श्वसन आजार, डायरीया, स्वाईन फ्लू, श्वान दंश, सर्पदंश अशा विविध रुग्णांवर उपचार करण्यात आले आहे. जिल्ह्यात साथरोगांच्या आजारात मोठी वाढ झाल्याचे या आकडेवारीवरून लक्षात येत आहे.