तिवसा बाजार समिती सभापतिपदी तांबेकर अविरोध
By Admin | Updated: October 10, 2015 00:47 IST2015-10-10T00:47:59+5:302015-10-10T00:47:59+5:30
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी आयोजित विशेष सभेत रामराव तांबेकर यांची सभापती व कमलाकर वाघ यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली.

तिवसा बाजार समिती सभापतिपदी तांबेकर अविरोध
ठाकूर गटाचा झेंडा : उपसभापती कमलाकर वाघ
रोशन कडू तिवसा
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शुक्रवारी आयोजित विशेष सभेत रामराव तांबेकर यांची सभापती व कमलाकर वाघ यांची उपसभापतिपदी अविरोध निवड झाली. बाजार समितीचे सर्वच म्हणजे १८ ही संचालक ठाकूर गटाचे असल्याने पक्षश्रेष्ठी कुणाला कौल देतात, ही केवळ औपचारिकताच उरली होती.
बाजार समिती सभागृहात शुक्रवारी आयोजित विशेष बैठकीत सभापतिपदासाठी रामराव तांबेकर व उपसभापती कमलाकर वाघ यांचेच अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी ए.व्ही. राऊत यांनी त्यांना अविरोध घोषित केले. यावेळी सभागृहात संजय वै. देशमुख, गजानन देशमुख, मोहन चर्जन, सुखदेव दमाये, हरिभाऊ पाचघरे, रणजीत राऊत, श्रीकृष्ण राऊत, संगीता सुरेंद्र साबळे, किशोर चौधरी, दिनेश साव, प्रदीप बोके, विशाल केने, प्रमोद धावडे, गोपाल बिजवे, तुळशीराम भोयर, योगेश वानखडे संचालक उपस्थित होते.
नवनिर्वाचित सभापती रामराव तांबेकर हे अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून व उपसभापती कमलाकर वाघ हे सहकारी सोसायटी मतदारसंघातून विजयी झाले आहेत. आ. यशोमती ठाकूर व माजी आ. भय्यासाहेब ठाकूर यांच्या उपस्थितीत विजयी जल्लोष करण्यात आला.