आता थम्ब इम्प्रेशनने निघणार एटीएममधून पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 17:35 IST2017-11-11T16:06:53+5:302017-11-11T17:35:45+5:30

कार्डऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएममधून पैसे काढले जाणार आहेत. ही बायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरकडे विचारधीन आहे.

Thumb Impressions Now Money From ATMs | आता थम्ब इम्प्रेशनने निघणार एटीएममधून पैसे

आता थम्ब इम्प्रेशनने निघणार एटीएममधून पैसे

ठळक मुद्देनवीन यंत्रणा प्रस्तावितसायबर गुन्ह्यांवर अंकुश लावण्याचे प्रयत्न

वैभव बाबरेकर
आॅनलाईन लोकमत
अमरावती : कार्डऐवजी यापुढे थम्ब इम्प्रेशनचा वापर करून एटीएममधून पैसे काढले जाणार आहेत. ही बायोमेट्रिक प्रणाली पुढील काळात कार्यान्वित करण्याचा प्रस्ताव स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कॉर्पोरेट सेंटरकडे विचारधीन आहे.
गेल्या काही वर्षांत सायबर गुन्हेगारीने नवनवीन फंडे वापरून बँक खात्यांमधील रक्कम लंपास करण्याचा सपाटा लावला आहे. पूर्वी एटीएमचे पिन विचारले जायचे. आता तर काहीही न विचारताही पैसे काढले जात आहेत. खातेदारांच्या पैशांच्या सुरक्षेसाठी स्टेट बँक आॅफ इंडियाने आता बायोमेट्रिक प्रणालीचा वापर करण्याचा प्रस्ताव आखला आहे.
प्रत्येक नागरिकाचे फिंगरप्रिंट वेगवेगळे असते. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना थम्ब इम्प्रेशनने सेवेवर हजर असल्याची नोंद बायोमेट्रिक पद्धतीने करावी लागते. हीच थम्ब सिस्टीम आता एटीएमसाठी लागू करण्याचा प्रस्ताव विचाराधिन आहे. एटीएममध्ये कार्डऐवजी थम्ब इम्प्रेशनने खातेदारांना पैसे काढता येणार आहे. या प्रणालीमुळे एटीएम कार्ड वा पासवर्डची गरज राहणार नसली तरी प्रत्येकाचे फिंगरप्रिंट वेगवेगळे असल्याने कुणालाही कुणाचेही पैसे सहज काढता येणार नाहीत. ही पद्धती कार्यान्वित करण्याचे मुंबई येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या कारार्पेरेट सेंटरकडे प्रस्तावित असून, लवकरच ती लागू झालेली असेल, अशी माहिती बँक अधिकाऱ्यांनी दिली.

नागरिकांच्या ठेवी सुरक्षित ठेवण्याचे प्रयत्न वरिष्ठ स्तरावरून केले जात आहेत. यासाठी आगामी काळात एटीएममध्ये थम्ब इम्प्रेशन सिस्टीम लागू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर प्रस्तावित आहे.
अश्विन चौधरी,
मुख्य प्रबंधक, क्षेत्रीय व्यवसाय कार्यालय.

Web Title: Thumb Impressions Now Money From ATMs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.